Dhule

साक्री व धुळे येथील दोन घरफोडींचा 24 तासात उलगडा…धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..

साक्री व धुळे येथील दोन घरफोडींचा 24 तासात उलगडा…धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी..

असद खाटीक

धुळे दिनांक २१/१०/२०२० रोजी साक्री शहरात नागाई कॉलनी येथील दिलीप विठोबा पाटील यांचे राहाते घरात सकाळी ०९.०० ते ११.०० वा. चे दरम्यान घरफोडी चोरी होऊन १,६०,०००/- रु चा मुद्देमाल अज्ञात चोरटयाने चोरुन
नेल्याने त्यांचे फिर्यादीवरुन साक्री पोलीस पणे येथे गुरनं १५७/२०२० कलम ४५४,३८० भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा हा जिमी विपीन शर्मा रा. नंदुरबार याने केल्याची माहिती स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत यांना मिळाली असता त्यांनी सपोनि/ बोरसे, पोहेकों/ संदिप थोरात, पोना/ कुणाल पानपाटील, पोकॉ/ रविकिरण
राठोड, पोकॉ/ योगेश जगताप,पोकॉ/९५४ किशोर पाटील यांना सुचना देऊन आरोपीचा शोध घेणे कामी दिनांक २३/१०/२०२० रोजी नंदुरबार येथे रवाना केले. सदर पथकाने स्थानिक पोलीसांची मदत घेऊन दिनांक २३/१०/२०२० व
दिनांक २४/१०/२०२० रोजीचे सायंकाळ पर्यंत शोध घेतला परंतु आरोपी मिळुन आला नाही.

दरम्यान दिनांक २४/१०/२०२० रोजी साक्री व धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीत दिवसाची घरफोडी झाल्याची सदर पथकास माहिती झाल्याने व सदरचे गुन्हे हे सुध्दा आरोपी नामे जिमी बिपीन शर्मा यानेच केल्याची खात्रीलायक माहिती
मिळाल्याने सदर पथकाने धुळे येथुन नंदुरबार कडे जाणाऱ्या मार्गावर नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे नंदुरबार शहर
पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचेसह सापळा लावला असता सायंकाळी २०.१५ वा. दरम्यान आरोपी हा बजाज एवेंजर मोटार सायकल क्रमांक एम एच – ३९- पी. – ०६४५ वरुन येताना सदर पथकास दिसला असता त्यास वाहानास
अडथळा करुन ताब्यात घेतले व त्याची अंगझडती तसेच मोटार सायकलची झडती घेता त्याचे ताब्यात व मोटार सायकलचे डिक्की मध्ये सोन्याचे व चांदीचे दागीने , रोख रक्कम तसेच घरफोडीचे हत्यार असा एकुण १,३१,५९७/- रु
चा मुद्देमाल मिळुन आला तसेच रुपये ९०,०००/- रु किमतीची मोटार सायकल असा एकुण २,२१,५९७/- रु चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त केला.
सदर आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेऊन विचारपुस करता त्याने जप्त केलेल्या मुद्देमाला पैकी सोन्याचांदीचे दागीने हे साक्री पो स्टे हरीतील आश्रम शाळेजवळील घरात चोरी केल्याचे सांगीतले त्यासंदर्भात साक्री पो स्टे ला गुरनं
१६०/२०२० भादवि कलम ४५४,३८० दाखल असुन गप्त मुद्देमाला पैकी रोख रक्कम हि धुळे शहरातील साक्री रोड स्वामी समर्थ मंदिर जवळील घरात केल्याचे सांगीतले असुन त्यासंदर्भात धुळे शहर पो स्टे येथे गुरनं २००/२०२० भादवि
कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल आहे. सदर आरोपीतास मुद्देमालासह साक्री पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असुन आरोपीताने साक्री व धुळे शहरात वेगवेळ्या ठिकाणी घरफोडी चोरी केल्याचे कबुल केले आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर नंदुरबार जिल्हयात वेगवेगळया पो स्टे ला गुन्हे दाखल असुन हरियाना राज्यात सुध्दा त्याचेवर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक श्री. चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत बच्छाव यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, सपोनि/श्री. उमेश बोरसे, पोहेकॉ/ संदिप थोरात, पोना/ कुणाल पानपाटील, पोकों/ रविकिरण राठोड, पोकॉ/ योगेश जगताप,पोकॉ/९५४ किशोर पाटील यांनी नंदुरबार शहर पो स्टे शोध पथकाचे पोना/ भटु धनगर, पोकॉ/ अनिल बड़े, पोकॉ/राजपुत यांचे मदतीने पार पाडलेली आहे. आरोपीकडे अधिक विचारपुस चालु असुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button