Maharashtra

आदिवासी पारधी परिवर्तन परिषद, पारधी समाजात करतोय जनजागृती

आदिवासी पारधी परिवर्तन परिषद, पारधी समाजात करतोय जनजागृती

आदिवासी पारधी परिवर्तन परिषद, पारधी समाजात करतोय जनजागृती स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आदिवासी जमाती व भटक्या जमातींचा विशेष सहभाग होता.ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतीकारामध्ये आदिवासी क्रांतिकारकांचे विशेष स्थान होते.परंतू आदिवासी व भटक्या जमातींना आळा घालण्यासाठी सन 1871 साली ब्रिटिश सरकारने बॉम्बे प्रेसिडेन्सी कायद्याअंतर्गत”गुन्हेगार जमात कायदा तयार केला.त्यातूनच गुन्हेगारी जमात म्हणून आदिवासी व भटक्या जमातींना त्यावर शिक्का मारला.सन 1952 मध्ये केंद्र सरकारने ह्या जमातींना गुन्हेगारी कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केले.पण आजही आदिवासी व भटक्या जमातींना संशयित गुन्हेगार जमाती म्हणून ओळखले जाते.
आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेच्या माध्यमातून गुन्हेगारी कायदाच्या मुक्ती दिवस म्हणून वेबिनार सत्राचे आयोजन रविवारी सायंकाळी 5 ते 7या वेळेत केलेले होते.वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष श्री.प्रा.किसनराव चव्हाण हे उपस्थित होते.प्रा.चव्हाण सरांनी आदिवासी व भटक्या जमातींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत,त्यांना शासनाच्या अनेक सवलती पासून वंचित ठेवले.आदिवासी व भटक्या जमाती अजून शिक्षणापासून वंचित आहेत,लोकांना रोजगार,पक्की घरे,जमिनी पासून राजकीय लोकांनी कोसोदूर ठेवलेले आहे असे मनोगत व्यक्त केले.आदिवासी व भटक्या जमातींना शिका,संघटित व्हा व संघर्षं करा चा नारा प्रा.किसनराव चव्हाण सरांनी दिला.त्याच बरोबर परिवर्तन परिषद मधील तरुण राज्य समन्वयक टिम .परिवर्तन कार्यकारणीचे सुध्दा विशेष कौतुक केले.कोरोणाच्या काळात सुध्दा पारधी समाजाची एकत्र बांधणी करुन ठेवण्यासाठी परिवर्तन काम करतआहे.असेही ते म्हणाले ,हि तरुण शिकलेली पिढी आहे त्यांना कायद्याचे ज्ञान आहे त्याच्याकडे समाजाला योग्य दिशेने घेऊन नेतृत्व करण्यासाठी ते इच्छित आहेत .त्यांना आपल्या समाजातील लोकांनी पाठबळ देण्याची गरज आहे असेही ते म्हणाले .
वेबिनार यशस्वी करण्यासाठी आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक श्री. अर्जुन काळे ,श्री.परमेश्वर काळे,आनंद काळे,बापूराव काळे,वैभव काळे, प्रमोद काळे ,सौ.बबिता काळे,सागर भोसले. जाॕकी पवार.आदेश काळे.आदिवासी परिवर्तन परिषद कार्यकारणी. आदी सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.आॕनलाईन वेबीनारसाठी बहुसंख्याने पारधी बांधव हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button