Baramati

अन्यायग्रस्त कांचनच्या आमरण उपोषणाला आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने दिला जाहीर पाठिंबा !

अन्यायग्रस्त कांचनच्या आमरण उपोषणाला आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेने दिला जाहीर पाठिंबा !

प्रतिनिधी- श्री.आनंद काळे

बारामती – मौजे सोंनगाव ता.बारामती येथील अन्यायग्रस्त महिला सौ.कांचन भोसले ही दि.१०/०१/०२२ पासून प्रांत अधिकारी बारामती यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसलेली आहे.सदर आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे.मा. अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु राजकीय दडपणाखाली अधिकारी कच खात होते.आरोपींना आजतागायत अटक केलेली नाही, त्यामुळे आरोपी हे सोंनगावतील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असल्याने,सौ.कांचन भोसलेवर केस मिटवन्यासाठी सारखे दबाब टाकत आहेत.त्या कारणाने आरोपींना त्वरित अटक व्हावी व न्याय मिळवण्यासाठी सौ.कांचन भोसले आमरण उपोषणाला बसले आहेत.आदिवासी पारधी परिवर्तन परिषेदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे,श्री.बापूराव काळे यांनी आंदोलन कर्त्या सौ.कांचन भोसले यांना त्वरित न्याय मिळावा व समाज्याला भेडसावणाऱ्या विविध मागण्यांसाठी मा. प्रांताधिकारी बारामती यांना जाहीर पाठिंब्याचे निवेदन दिले.निवेदनात मौजे मेखळी व मळद गावातील आदिवासी पारधी कुटूंबातील लोकांच्या घरांची नोंद धरून त्यांना शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर करण्यात यावे.तसेच मौजे वंजारवाडी गावातील गेली 30 वर्ष रहिवासी असणारे लोकांना स्थानिक गावातील गावगुंडांनी हाकलून दिलेले होते त्या कुटूंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदनावर आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे,श्री.बापूराव काळे,श्री.कुबेर भोसले,श्री.लाला भोसले,श्री भगवान भोसले,श्री.आकाश भोसले,श्री.सागर काळे,अभिजित काळे,सूरज काळे,सचिन काळे,अमोल काळे ,महेंद्र काळे आदी.मान्यवरांनी सह्या केलेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button