Baramati

खंडणीचा गुन्हा दाखल होणेकामी बारामतीत आमरण उपोषण

खंडणीचा गुन्हा दाखल होणेकामी बारामतीत आमरण उपोषण

प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील मौजे कारखेल ता.बारामती येथील रहिवासी श्री.लाला भोसले व त्यांचे कुटुंबीय बारामती उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
पुरुषोत्तम निलू पवार, रिंकू निलू पवार व दोहोंच्या पत्नी (नावे माहीत नाहीत) हे दोघेही भाऊ आर पी आय(A) पुणे जिल्हा पारधी आघाडी पदावर कार्यरत आहेत. ते पदाचा गैरवापर करून पारधी समाज्यातील अडाणी व गरीब लोकांना पैसेसाठी नाहक त्रास देत आहेत.

सदर, घटनेची हकिकत अशी की,उपोषणकर्ते यांच्याविरुद्ध पुरुषोत्तम पवार याने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे खोटी तक्रार केलेली होती.त्या तक्रारीचा निपटारा होण्यासाठी उपोषणकर्ते यांच्याकडून पुरुषोत्तम पवार,रिंकू पवार व दोहोंच्या पत्नी यांनी 3 लाख रुपयांची मागणी केली.त्या कारणांस्तव उपोषणकर्ते श्री.लाला भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विशेष वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना आमरण उपोषणाच्या प्रति पाठवून ते आजपासून बारामती उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर वरील व्यक्तीवर खंडनीचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषणकर्ते लाला भोसले आमरण उपोषणाला बसणार आहेत.अशी माहिती स्थानिक प्रतिनिधीला दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button