Baramati

धनाढ्य राजकीय पुढारी विरोधात, विधवा महिलेचा एल्गार !

धनाढ्य राजकीय पुढारी विरोधात, विधवा महिलेचा एल्गार !

प्रतिनिधी – श्री.आनंद काळे

बारामती – मोना उर्फ जयश्री मुस्तफा पठाण ह्या महिलेचा पती मुस्तफा पठाण हा काही महिन्यांपूर्वी मयत झालेला आहे.मयत मुस्तफा पठाण यांचे इंदापूर शहरामध्ये वडिलोपार्जित मालकी हक्कांची जमीन होती.कायदेशीर हिस्सा वाटप करून मिळण्यासाठी रे.गु.नं.१५९/२००५ मध्ये इंदापूर दिवाणी न्यायालयात दावा दाखल होता. परंतू मयत मुस्तफा पठाण हा व्यसनी व अज्ञानी असल्याने काही लोकांच्या हव्यासापोटी दाव्याची तडजोड करून घेतली.दाव्यासाठी दिलेला वकील ह्यांची पूर्णत्व फी दिलेली असताना व मयत मुस्तफा पठाण हे अज्ञान व दारूच्या आहेरी गेल्याचे असल्याने इंदापूर शहरातील काही राजकीय धनाढ्य व प्रतिष्ठित व्यक्तींनी त्याचा फायदा घेऊन ती जमीन लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे.असे आमरण उपोषणकर्त्या मोना उर्फ जयश्री मुस्तफा पठाण प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

मयत मुस्तफा पठाण हे दि.०६/११/२०२१ रोजी मयत झालेले आहेत.त्यानंतर उपोषणकर्त्यांनी तडजोडीचे कागदपत्रे तपासल्यानंतर आपली व मयत पती मुस्तफा पठाण यांची घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.उपोषणकर्त्यांनी इंदापूर न्यायालयात रे.गु.नं.१२/२०२२ मध्ये दावा दाखल केल्यानंतर त्या मोकळ्या जमिनीवर जाऊन पाहिले असता त्याठिकाणी बांधकाम चालू असल्याचे आढळून आले.त्यामध्ये इसमनामे १)अधिकराव धनाजी रूपणवर २)मच्छिंद्र दामोदर मगर ३) संतोष रामभाऊ शिंदे हे बांधकाम करीत असताना आढळून आले.त्याबाबत विचारले असता त्यांनी १)सौ.संगीता श्रेणीक शहा २)सौ.राधिका संदेश शहा ३)संदीप सुभाष शहा ४)श्री.वसंत एकनाथ माळुंजकर ५) जबिन आझाद पटेल ६) संदीप किसन पांढरे ७) देवराज कोंडीबा जाधव ८) प्रतीक सुधाकर शिंदे ९) इंदिरा प्रतीक शिंदे १०) सोहेल आझाद पठाण ११) अधिकराव धनाजी रूपणवर १२) मच्छिद्र दामोदर मगर १३) संतोष रामभाऊ शिंदे १४)शबनम आलम शेख यांच्याकडून विकत घेतलेली आहे.असे म्हणून उपोषणकर्त्या मोना उर्फ जयश्री मुस्तफा पठाण यांस शिवीगाळ केली.या जमिनीचा तुझ्याशी काहिमात्र संबंध नाही आणि परत जर तू या ठिकाणी आलीस तर तुला या जमिनीमध्ये जिवंत गाडू.आमच्या पाठीशी ऍड.राहुल मखरे आहेत.त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही.

त्यामुळे वरील इसमनामे १ ते १४ यांनी बेकायदेशीर दस्त बनवून उपोषणकर्त्या व तिचे मयत पती मुस्तफा पठाण यांची फसवणूक केलेली आहे.वरील इसमनामे १ ते १४ वर भादवी कलम ४२० व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे यासाठी उपोषणकर्त्या मोना उर्फ जयश्री मुस्तफा पठाण हे इंदापूर तहसिल कार्यालयासमोर गेली 4 दिवस आमरण उपोषणास बसलेले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button