Baramati

बारामतीत नवीन तीन साठवण तलाव उभारणार

बारामतीत नवीन तीन साठवण तलाव उभारणार

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – बारामतीमध्ये नवीन तीन तलाव उभारले जाणार आहेत.घारे इस्टेट 190,तांदुळवाडी 250 तर जळोचीच्या साठवण तलावाची क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल.बारामतीच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ह नीरा डावा कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असतो.दरवर्षी उन्हाळ्यात नीरा डावा कालव्याचे आवर्तन लाबल्यावर बारामतीला दोन किंवा तीन दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. हे दुखणे कायमचे संपवून टाकण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बारामतीत सध्याच्या दोन साठवण तलावाव्यक्तरित घारे इस्टेट, तांदुळवाडी व जळोची येथे तीन नवीन साठवण तलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
घारे इस्टेट190,तांदुळवाडी250 तर जळोचीच्या साठवण तलावाची क्षमता 180 दशलक्ष लिटर्स इतकी असेल.या पैकी घारे इस्टेट तलावाचे काम सध्या वेगाने सुरू असून लवकरच उर्वरित दोन्ही तलावाची कामेही मार्गी लागणार आहेत.सध्या बारामतीतील दोन्ही साठवण तलावाची क्षमता 483 दशलक्ष लिटर्स इतकी आहे.नव्या साठवण तलावाची क्षमता 620 दशलक्ष लिटर्स इतकी असेल. आत्ता बारामती नगरपालिकेची पाणी साठवण क्षमता 1103 दशलक्ष लिटर्स इतकी होईल.
या तिन्ही तलावाचे काम होण्यासाठी 2023 साल उजाडेल असा प्राथमिक अंदाज आहे.2023 ते2038 आणि 2038 ते 2053 असा आगामी 30 वर्षाचा विचार व वाढणारी अंदाजे लोकसंख्या गृहीत धरून हा प्रकल्प उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हाती घेतला आहे.आगामी काळात नगरपालिकेचा वाढलेला विस्तार व शहराची वाढलेली लोकसंख्या विचारात घेता दैनंदिन 25 दशलक्ष लिटर्स दररोज पाणी लागेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.त्यातही बारामतीला सातही दिवस चोवीस तास पाणी देण्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वप्न आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button