Yawatmal

आदिवासी सूचित धनगराचा समावेश करु नका-बिरसा क्रांती दलाची मागणी.

आदिवासी सूचित धनगराचा समावेश करु नका-बिरसा क्रांती दलाची मागणी.

यवतमाळ / प्रतिनिधी – प्रफुल्ल कोवे

अनुसूचित जमातीचा यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणी नुकतीच लोकसभे मध्ये खा.सुप्रिया सुळे आणि खा.रणजित निंबाळकर यांनी केली आहे .
या असंवैधानिक मागणीला बिरसा क्रांती दलाने जोरदार विरोध करीत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय आदिवासी मंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठवून धनगर समाजाला आदिवासींच्या यादीत समाविष्ट करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे.

विशेष म्हणजे धनगर समाजाने नुकतेच मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन केले आहे.आणि आता आजपासून (ता. २७ व २८ ) सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तालुक्याच्या ठिकाणी ‘ आदिवासी धनगर ‘ या नावाने अधिवेशन चालू आहे.

बिरसा क्रांती दलाने निवेदनात स्पष्ट केले की, धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. असा दावा बिरसा क्रांती दलाने केला आहे.

महाराष्ट्राच्या सुचित Dhangad (धांगड) या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे.त्याचे भाषांतर धांगड असे हवे आहे.महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ओराँन जमात आहे.तीची पोटजमात धांगड आहे.महाराष्ट्रात ओराँन, धांगड नाहीत. पण सुचित आहे.

ओराँनच्या शेतात ,घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय.या दोन्ही जमातीचे खानपान ,रितीरिवाज, प्रथा,परंपरा, विधीसंस्कार सारखेच आहेत.ओराँन ,धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पुजा करतात. अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहे.त्यांचा मुख्य सण सरहुल आहे.ओराँन, धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात. धनगर जातीचा या जमातीशी तीळमात्र संबंध नाही.

महाराष्ट्र शासनाने सन १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.यावर संबंधित विभागात सखोल चर्चा ही झाली पण धनगर समाज आदिवासींचे निकष पुर्ण करु शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला.

१२ जुलै २००५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीने खास बैठक घेऊन धनगरांच्या प्रश्नावर चर्चा केली, धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येते का ? याकरीता संशोधन पथक तयार करून २००६ साली एप्रिल महिन्यात बिहार, ओरीसा व झारखंड राज्यात पाठविण्यात आले.धनगर जातीला या राज्यात समाविष्ट केले आहेत काय ? याचा शोध घेणे.या संशोधन पथकाने १ जून २००६ रोजी अहवाल सादर केला. पथकाने असे लिहिले आहे की, ओराँन जमातीतील जे लोक
दुसऱ्याच्या शेतावर अथवा घरात मजूर म्हणून काम करतात त्यांना धांगड असे म्हणतात. त्यामुळे बिहार, ओरीसा, झारखंड या राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. तथापि धांगड या शब्दाचे इंग्रजी मध्ये Dhangad असे स्पेलींग होते. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत Dhangad धांगड ही ओराँनची तत्सम जमात म्हणून नमूद केले आहे. या दोन्ही जमाती आणि धनगर भिन्न आहे.धनगर ही जात आहे जमात नाही.

आँल इंडिया धनगर समाज महासंघाने अलाहाबाद कोर्टात १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दि.१४/३/२०१४ रोजी निर्णय दिला की धनगर ही जात आहे,जमात नाही. त्यामुळे ती अनुसूचित जातीच्या (sc ) प्रवर्गात येत असून त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यावे.

धनगर आदिवासी नाहीत म्हणून यवतमाळ जिल्हा गँझेट १९०८ पान क्र.२०१ वर धनोजे कुणबी व धनगर एकच समाज असल्याचे म्हटले आहे डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरे अधिवेशन पंढरपूर येथे भरविले होते .तेव्हा धनगरांनी त्या अधिवेशनाला जाहिरात दिली होती.ती क्षत्रिय धनगर अशी होती.
आर.ई.ईन्थाव्हेन यांच्या खंड क्र.१ ,आर.व्ही.रसेल हे धनगरांना जमात न म्हणता जात म्हणूनच लिहतात.
महात्मा फुले यांच्या ‘ शेतकऱ्यांचा आसूड ‘ आदी ग्रंथातील हा दाखले दिले आहे.
धनगर आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. ते आदिवासी नाहीत , ही मागणीच असंवैधानिक आहे.त्यामुळे भारत सरकारने कोणत्याही प्रकारची धनगराची शिफारस स्विकारु नये आणि त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करु नये. अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी , महासचिव प्रमोद घोडाम, जिल्हाध्यक्ष प्रा.कैलास बोके,जिल्हा महासचिव प्रफुल कोवे, शरद चांदेकर, संजय मडावी, रमेश मडावी, अतुल कोवे,विशाल राजगडकर, सुरेश मेश्राम आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button