Bollywood

Tokyo Olmpics Efect… चक दे इंडियाची राक्षसों की सेना…म्हणजे हॉकी गर्ल गॅंग सध्या काय करतेय..!पहा किती झालाय बदल…

Tokyo Olmpics Efect… चक दे इंडियाची राक्षसों की सेना…म्हणजे हॉकी गर्ल गॅंग सध्या काय करतेय..!पहा किती झालाय बदल…

टोक्यो ऑलिम्पिकमुळे ‘चक दे इंडिया’च्या आठवणी आणखी ताज्या झाल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी हा चित्रपट टेलिव्हिजनवर पाहताना आठवणी ताज्या झाल्या आणि मग विचार आला की तेंव्हा ह्या चित्रपटात काम करणाऱ्या ह्या सर्व दबंग गर्ल्स आता काय करताय..? सिनेमांचं नाव काढताच यातील हॉकीची गर्ल गँग आजही डोळ्यापुढे येते. ही गँग आता 14 वर्षानंतर कशी दिसते?

विद्या मावळदे

2007 साली आलेल्या ‘चक दे इंडिया’ या सिनेमातील वुमन्स हॉकी टीमची कॅप्टनची भूमिका साकारणारी अभिनेत्री विद्या माळवदे आता योगा शिकवत आहे. विद्याची ही भूमिका चांगलीच गाजली होती. पण विद्याचे करिअरला याचा फार काही फायदा झाला नाही. आता ती इंडस्ट्रीतून बाहेर पडून योगा शिकवते आहे.

सागरिका घाटगे

‘चक दे इंडिया’मध्ये प्रीती सबरवालची भूमिका साकारली होती. आजही सागरिका चक्क दे गर्ल म्हणूनच ओळखली जाते. 2017 साली सागरिकाने प्रसिद्ध क्रिकेटर झहीर खानसोबत लग्न केले. लग्नानंतर सागरिकाने सिनेमांपासून दूर गेली. सागरिका नॅशनल हॉकी प्लेअर आहे. याच कारणामुळे सागरिका ‘चक दे इंडिया’त दिसली होती.

चित्राशी रावत

हिने ‘चक दे इंडिया’मध्ये कोमल चौटालाची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर ती फॅशन, लक, तेरे नाम लव हो गया अशा अनेक सिनेमात दिसली. काही शो सुद्धा केले. पण सध्या ती बॉलिवूडपासून जरा दुरावली आहे.
शिल्पा शुक्लाने या सिनेमात बिंदिया नाईकची भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर बीए पास, के्रझी चुक्कड फॅमिली अशा सिनेमात ती दिसली.

तान्या अब्रोल

सिनेमात पंजाबी गर्ल बलबीर कौरची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर सीआयडी, ये है आशिकी अशा शोमध्ये दिसली होती.

अनयथा नायर

आलिया बोसची भूमिका साकारणारी अनयथा नायर हिने अनेक मल्याळम व हिंदी सिनेमात काम केले. वेल डन अब्बा, झूठा ही सही, फोर्स सिनेमात तिी दिसली. आता ती सिंगापूरमध्ये मोठी हेअरस्टाईलिस्ट बनलीये. तिला एक मुलगी आहे आणि या मुलीचे नाव तिने तिच्या भूमिकेच्या नावावरून आलिया ठेवले आहे.

शुभी मेहता

‘चक दे इंडिया’मध्ये गुंजन लखानीची भूमिका करणारी शूभिने अ‍ॅक्टिंगला रामराम ठोकला असून संसारात रमली आहे.

संडीया फुरताडो

सिनेमात नेत्रा रेड्डीची भूमिका साकारली होती. ती ख-या आयुष्यातही हॉकी प्लेअर होती. पण आता ती पीआर प्रोफेशनमध्ये आहे आणि पतीसोबत लंडनमध्ये स्थायिक झाली आहे.

आर्या मेनन

गुल इक्बालची भूमिका साकारली होती. चक दे इंडियानंतर तिने काही जाहिरातींमध्ये काम केले. पण नंतर अ‍ॅक्टिंगला कायमचा रामराम ठोकला. सध्या ती अ‍ॅडव्हटायझिंग प्रोड्यूसर म्हणून काम करते

संबंधित लेख

Back to top button