Maharashtra

नियम मोडणाऱ्यांवर अक्कलकोट तालुका प्रशासनाची धडक कारवाईची मोहीम रक्कम 223900/- दंडाची केली वसुली

नियम मोडणाऱ्यांवर अक्कलकोट तालुका प्रशासनाची धडक कारवाईची मोहीम रक्कम 223900/- दंडाची केली वसुली

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट, दि ११ :- कोरोना (Covid-19) या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अक्कलकोट शहर व तालुक्‍यात महसूल खाते, पोलिस प्रशासन, नगरपरिषद आदी तिन्ही विभागांनी मिळून कारवाईला सुरवात केली आहे. आजपर्यंत एकूण एक हजार 755 केसेस करून दोन लाख 23 हजार 900 रुपये दंड वसूल केल्याची माहिती अक्कलकोटचे तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.

शुक्रवारी महसूलने एका दिवसात 244 केसेस करून 25 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये अक्कलकोटमध्ये 10 केसेस : एक हजार रुपये, चपळगाव 25 केसेस : 2500 रुपये, किणी 25 केसेस : 2500 रुपये, वागदरी 61 केसेस : 6100 रुपये, जेऊर 45 केसेस : 4500 रुपये, दुधनी 30 केसेस : 3000 रुपये, मैंदर्गी 21 केसेस : 2100 रुपये, तडवळ 20 केसेस 2000 रुपये व करजगी 7 केसेस : 1500 रुपये वसूल केले. एवढी मोठी कारवाई होत असूनही नागरिक पोलिसांची नजर चुकवून अजूनही वेगळ्या रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी दिवसभर अक्कलकोट शहरासह सर्व मंडळात मंडलाधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या पथकाने डबलसीट, मास्क नसलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केला.
तसेच अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात दंडाची भीती निर्माण झाली असून, यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसला आहे. सकाळी सात वाजल्यापासून या दंडात्मक कारवाईला सुरवात झाली. अक्कलकोट शहरातील ए-वन चौकात तहसीलदार अंजली मरोड यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी चंद्रकांत इंगोले, नूरदीन मुजावर, प्रीती साळुंखे, विष्णुदास चोरमुले, सतीश जगताप यांनी दंडात्मक कारवाई केली. किणी व वागदरी मंडलाधिकारी यांनी संयुक्त कारवाई करत सांगवीच्या पुढे वागदरी रोडवर दिवसभर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये किणी मंडलाधिकारी मनोज निंबाळकर, वागदरी मंडलाधिकारी संतोष कांबळे, एस. आय. शेख, किणीचे समाधान काळे, सिद्धेश्वर जाधव, तानाजी सरवदे आदींनी ही कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button