World

Tokyo Olmpics Breaking…भारताच्या क्रीडाविश्वातील ऐतिहासिक “सुवर्ण अध्याय”रचला नीरजने !

Tokyo Olmpics Breaking…भारताच्या क्रीडाविश्वातील ऐतिहासिक “सुवर्ण अध्याय”रचला नीरजने !

भारताचा ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा याने भालाफेक खेळात सुवर्णपदक पटकावून देशाच्या क्रीडाविश्वात नवा अध्याय रचला आहे. नीरज चोप्राच्या या सुवर्ण पदकासह भारताने आजपर्यंतच्या सर्व ऑलिम्पिक स्पर्धांमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.

ज्या खेळाची भारतात कोणी फारशी दखल घेत नाही त्यामध्ये नीरज चोप्रा ने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. असे नीरज चोप्रा मोठ्या संख्येने देशाला मिळो.

कोण आहे नीरज..

नीरज चोपडा (नीरज चोप्रा) हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी फ्रान्समध्ये झालेल्या ॲथलेटिक स्पर्धेत ८५.१७ मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्यांनी ‘दोहा डायमंड लीग’मध्ये भालाफेकीत ८७.४३ मीटरचा राष्ट्रीय उच्चांक स्थापित केला. २०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.

नीरजचा जन्म २४ डिसेंबर, १९९७ रोजी पानिपत,हरियाणायेथे झाला आहे.
भालाफेक ह्या खेळात करियर करत आता पर्यंत अनेक पदकांचा मानकरी नीरज आहे.

२०१८ मध्ये जकार्ता, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज यांनी सुवर्णपदक मिळवले.आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान त्यांना मिळाला. आपले सुवर्णपदक त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केले होते.

आज टोकियो ऑलम्पिक मध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्ण क्षण कायमस्वरूपी इतिहासात नोंदवले गेले आहेत. सर्व ह0जगातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button