Amalner

अमळनेर च्या क्रांतीभूमीत क्रांतिकारकांचे स्मारक उभारावे..!क्रांती स्मारक समितीचे निवेदन..

अमळनेरच्या क्रांतीभूमीत क्रांतिकारकांचे स्मारक उभारावे..!क्रांती स्मारक समितीचे निवेदन..

अमळनेर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अमळनेरच्या क्रांतिभूमीत क्रांतिकारकांचे स्मारक उभारावे या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांच्या क्रांती स्मारक समितीतर्फे देण्यात आले.
भारतात स्वातंत्र्य वर्षाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.अमळनेरच्या क्रांतिभूमीत स्वातंत्र्य आंदोलनात योगदान देणारे डांगरी गावचे क्रांतिकारक उत्तमराव पाटील, क्रांतीविरंगणा लिलाताई पाटील आणि संपूर्ण कुटुंबाने मोठे योगदान दिलेले आहे.ब्रिटिश साम्राज्याचे अमळनेर चे पोस्टऑफीस,कोर्ट,स्टेशन यावेळी १९४२ च्या आंदोलनात जाळून टाकण्यात आलेले होते.या लढ्याची प्रेरणादायी आठवण नव्या पिढीला व्हावी म्हणून अमळनेर च्या भूमित क्रांती स्मारक लोकप्रतिनिधी यांनी उभारावे या मागणीचे निवेदन शिरूड नाका येथे मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांना देण्यात आले.

याप्रसंगी कार्यकर्ते प्रा.डॉ.विलास पाटील,कैलास पाटील, प्रा लिलाधर पाटील, रणजित शिंदे,बापूराव ठाकरे,प्रा.सुभाष पाटील, बाळासाहेब कदम,भगवान देवरे,अनंत सूर्यवंशी,नगरसेवक श्याम पाटील,प्रेमराज पवार,श्रीकांत चिखलोदकर, आर बी पाटील, रंगराव पाटील, खैरनार, कार्यकर्ते जेष्ठ मनोहर पाटील, प्रा अशोक पवार,आदीं कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button