Amalner

Amalner: दिवंगत प्राचार्य सी.आय. मोरे स्मृति आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉ. प्रमोद पवार यांना जाहीर

यंदाचा दिवंगत प्राचार्य सी.आय. मोरे स्मृति आदर्श प्राचार्य पुरस्कार डॉ. प्रमोद पवार यांना जाहीर

शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शा.मा. चव्हाण संस्थेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “दिवंगत प्राचार्य सी.आय. मोरे स्मृति आदर्श प्राचार्य पुरस्कार” धनदाई माता कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांना जाहीर करण्यात आलेला आहे. प्राचार्य पवार हे विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता असून ते महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेचे अध्यक्ष तथा ‘विचारमंथन’ या रिसर्च जर्नलचे संपादक आहेत.

सदर पुरस्कार प्रदान सोहळा दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9:30 वाजता धनदाई महाविद्यालयाच्या सभागृहात होणार असून या पुरस्कार सोहळ्यासाठी अमळनेर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती विनोदभैय्या पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून अजमेरा कॉलेज, धुळे च्या माजी प्राचार्य डॉ उषा साळुंखे, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा डी. डी.पाटील, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन के. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांचे कार्य संपूर्ण खान्देशास भूषणावह असून या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आव्हान प्राचार्य सी.आय. मोरे स्मृती आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलास चव्हाण तसेच शा.मा. चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारिजात चव्हाण, प्रसिद्ध कवी जगदीश देवपूरकर, प्रा. डॉ .संजय चव्हाण व मोहन मोरे आदींनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button