नगाव येथे राज्यव्यापी ई- पीक पाहणी डेमो app चा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
आज नगाव मंडळ भागातील ढेकु खुर्द येथे मा. उपविभागीय अधिकारी,अमळनेर भाग श्रीमती सीमा अहिरे मॅडम तसेच मा.तहसीलदार अमळनेर श्री मिलिंदकुमार वाघ सर यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी ई- पीक पाहणी डेमो app चा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला .
अमळनेर : आज नगाव मंडळ भागातील ढेकु खुर्द येथे मा. उपविभागीय अधिकारी,अमळनेर भाग श्रीमती सीमा अहिरे मॅडम तसेच मा.तहसीलदार अमळनेर श्री मिलिंदकुमार वाघ सर यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी ई- पीक पाहणी डेमो app चा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. पी एस पाटील मंडळ अधिकारी नगावं भाग, तसेच नगावं मंडळातील सर्व तलाठी श्री. स्वप्नील कुलकर्णी, श्री आशिष पारधे, श्री हर्षवर्धन मोरे, श्री महेश अहिरराव, श्रीमती राधिका गरुड प्रथमेश पिंगळे तसेच कोतवाल श्री पिरन गजरे यानी परिश्रम घेतले आणि सदर कार्यक्रमास समस्त ढेकु खुर्द व ढेकु बु आणि ढेकु तांडा या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.






