Champa

खेतापुर येथे भटक्या गोपाळ समाजावर आली उपासमारीची वेळ !

खेतापुर येथे भटक्या गोपाळ समाजावर आली उपासमारीची वेळ !

अनिल पवार

चांपा: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र जिल्हाबंदी असल्याने या लॉकडाऊनच्या काळात शहरात व गावोगावी फिरणारे , भटके , विमुक्त गोपाळ समाजाची मोठी पंचाईत झाली .त्यांना आहे त्या ठिकाणी थांबणे आवश्यक असल्याने कुही तालुक्यातील खेतापूर येथे असलेल्या शंभर पेक्षा जास्त मुलं, महिला, पुरुषांवर उपासमारीची वेळ आली आहेत .

नागपूर कुही तालुक्यातील खेतापूर येथील भटक्या गोपाळ समाजाचे एकूण पन्नास कुटुंबे गेल्या पन्नास वर्षापासून खेतापूर येथे फाटलेल्या चिंध्याच्या साडीच्या पाल टाकून झोपडया तयार करून राहू लागले .गावोगावी खेळ दाखवून आपले व कुटुंबीयांचे उदरनिर्वाह करीत होते .

राज्य व देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने सर्वत्र नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊन केले .त्यामुळे गावागावात व इतरत्र फिरून आपला व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे .त्याठिकाणी थांबायचे असल्याने जवळचे अन्नधान्य होते तोपर्यंत जगले .पण पैसा अन्नधान्य संपल्याने त्यांची उपासमार सुरू झाली .

गावात त्यांना कोणी मदत करीत नसल्याचे रूपचंद जाधव यांनी सांगितले .महसूल विभाग व सामाजिक संघटनाचे दानकर्ते कडून अती तात्काळ खेतापुर येथील गोपाळ समाजाला मदत करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रूपचंद जाधव यांनी केले आहे .

गोपाळ टोली वर अन्नधान्याची भेट करणाऱ्या दानकर्त्यांनी क्रुपया खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा ही नम्र विनंती ?

*अनिल पवार* ,
मो .7888259211

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button