Amalner

चोऱ्यांचे सत्र थांबेना..!विधवा महिलेच्या घरी सव्वा लाखांची चोरी..!पोलिसात गुन्हा दाखल..!

विधवा महिलेच्या घरी सव्वा लाखांची चोरी..!पोलिसात गुन्हा दाखल..!

अमळनेर येथील ग भा मालतीबाई कैलास पाटील वय 52 धंदा शेती रा. जुनोने ता. अमळनेर ह्या वरील ठिकाणी एकट्या राहतात.त्यांचे पती 6 वर्षापुर्वी मयत झालेले आहेत. त्यांची आठ एकर जमिन असुन ती निमबटाईने दिलेली आहे. दि.03/10/2021 रोजी शेतात पिकलेला कापुस 28280/- रुपयाला तसेच सुमारे 1 महिन्यांपुर्वी 23,000/- रुपयांची बाजरी विक्रीचे व इतर रोख रुपये व सोन्याची पोत असे सर्व पैसे घरातील धान्याच्या कोठीत ठेवले होते.

दि.04/10/2021 रोजी सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास घराला कडीकोंडाला कुलुप लावुन घर बंद करुन शेतात कापुस वेचण्यासाठी गेल्या असता त्यांच्या पच्छात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. दुपारी 2.00 वाजेच्या सुमारास शेतातुन परत घरी आली असता घराचा पुढील बाजुस असलेला लोखंडी जाळीचा दरवाजाला लावलेले कुलुप दिसले नाही व दरवाजा उघडा दिसला घरात जावुन पाहिले असता घरातील लोखंडी कोठीत ठेवलेला सामान अस्ताव्यस्त पडलेला होता व कोठीत ठेवलेले कपाशी विक्रीचे पैसे व सोन्याची पोत दिसले नाहीत म्हणुन घरात सदर पैशांचा व सोन्याची शोधाशोध केली असता ते मिळुन आले नाहीत म्हणुन खात्री झाल्यानंतर बंद घराचा कुलुप तोडुन व दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे.
चोरीस गेलेले पैसे व सोन्याचे वर्णन खालीलप्रमाणे,
1) 28,000/- रुपये रोख कपाशी विक्रीचे त्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटा कोठीत ठेवलेले
2)23,000/- रुपये रोख बाजरी विक्रीचे त्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटा कोठीत ठेवलेले
3)17,000/- रुपये रोख माझे जावई डिगंबर मधुकर पाटील यांनी शेती कामासाठी मला दिलेले त्यात 500 रुपये
दराच्या चलनी नोटा
4)10,000/- रुपये रोख त्यात 500 व 100 रुपये दराच्या चलनी नोटा माझी मुलगी अर्चना डिगंबर पाटील हिने माझ्याकडेस ठेवण्यास मला दिलेले.
5)15,000/- रुपये रोख मला पेन्शचे मिळालेले.त्यात 500 रुपये दराच्या चलनी नोटा

6)15,000/- रुपये किंमतीची सोन्याची 5 ग्रॅम वजनाची मनी मंगळसुत्र असलेली
8,000/- रुपये रोख व सोन्याचे दागिने वर्णनाचे रोख रुपये व सोन्याचे दागिणे चोरुन नेले आहेत. अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button