Amalner

अनधिकृत लालबाग शॉपिंग चे वाढीव बांधकाम प्रकरणी अनंत निकम यांचा हरकत अर्ज..

अनधिकृत लालबाग शॉपिंग चे वाढीव बांधकाम प्रकरणी अनंत निकम यांचा हरकत अर्ज..

विषय :न.पा.हद्दीतील लालबाग शॉपींग सेंटर मध्ये दुकाने पुढच्या साईटला १०
फुट बेकायदा बांधकाम प्रकरणी तक्रार आणि हरकती अर्ज…तक्रार अर्जदार :- श्री.अनंत रमेश निकम, सामाजिक कार्यकर्ता, अमळनेर
रा.श्रीकृष्ण कॉलनी, अमळनेर जि.जळगांव

नगरपरिषद क्षेत्रातील जबाबदार नागरी म्हणून कर्तव्य भावनेने आमच्यातर्फे सुचना पत्र देण्यात येते की, अमळनेर नगरपरिषद क्षेत्रातील लालबाग शॉपींग सेंटर हे अतिशय गजबजलेले व्यापारपेठ असून तेथे नगरपरिषदेच्या माध्यमातुन प्रत्येक दुकान हे सुमारे १० फुट वाढविण्याचा बेकायदा ठराव हा नगरपरिषदेने केलेला समजतो. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय
क्र.आबीडी-१०८१/८७१/रस्ते-७ दि.०९ मार्च २००१ च्या निर्देशानुसार रस्त्याचे समासिक अंतर सोडणे हे क्रमप्राप्त असते. तरी टाऊन प्लॅनिंगच्या नियमान्वये लालबाग शॉपींग सेंटर हे सुमारे ६० ते ७० वर्षापुर्वी बनविण्यात आलेले आहे. आताच्या नगरपरिषदेच्या बेकायदा ठरावामुळे टाऊन प्लॅनिंगच्या नियमांची १००% पायमल्ली होतांना दिसत आहे.त्यामुळे या कारणे रस्ते अपघातासह नागरीग वस्तीत अपघात, घातपात घडण्याची गंभिर परिस्थिती निर्माण होणार. तसेच आग लागण्या सारखी घटना जर भविष्यात घडलीतर अग्निशमन दलाची गाडी सहज रित्या जाऊ शकणार नाही. असे असतांना देखील नगरपरिषद उत्पन्न वाढविण्याचे तोटके कारण सांगुन लाल बाग शॉपींग सेंटरची दुकाने व्यापाऱ्यांच्या मागणीमुळे आम्ही वाढवित आहेत. त्याचप्रमाणे मागील ५ वर्षापुर्वी देखील लालबाग शॉपींग सेंटरच्या दुकानाची साईज लांबी मागील बाजुस सुमारे १० फुट वाढविण्यात आलेली होती. आणि आता देखील ग्राहकांची दुचाकी लावण्याच्या जागी (पाकींग) जागी १० फुट x ३० फुट असे वाढीव बेकायदा बांधकाम केले जात आहे. असे बेकायदा बांधकाम हे भविष्यात नागरीकांचा जिव धोक्यात घालण्यासारखे आहे. सद्याथीतीत या बेकायदा बांधकामास आपण थांबवावे. बेकायदा बांधकामाच्या फोटो प्रती सोबत जोडत आहे.टाऊन प्लॅनिंग जळगांव यांनी या बेकायदया बांधकामास परवानगी दिलेली समजते. तसेच नगर परिषद अमळनेर यांनी देखील बेकायदा ठराव केल्याचे समजते. तरी टाऊन प्लॅनिंगच्या कुठल्या नियमात हि परवानगी देण्यात आली याचा उलगडा होणे आगत्याचे. तसेच दिलेल्या परावनगीची व न.पा. ठरावाची आपल्या कार्यालयाकडुन खुलासा म्हणून एक प्रत आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेसाठी मिळावी. तसेच न.पा.नियमांची पायमल्ली करुन अनाधिकृत रित्या गाळे बांधकाम करणे यात प्रचंड असा आर्थिक (देवाण-घेवाण) व्यवहार झाल्याचे कळते.सदरील ही बाब महाराष्ट्र नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र न.प.न.पं.व औद्यो.नगरी अधि.१९६५ चे कलम १८९, १८९-अ अनुसार बेकायदा तथा फौजदारी पात्र गुन्हयात मोडणारी बाब आहे. हे कायदयाने स्पष्ट आहे.

करीता कृपया सदर लालबाग शॉपींग सेंटर मधील बेकायदा अनाधिकृत बांधकाम व
रस्त्याच्या कडेचे वाढीव बांधकाम नियम बाहय अंतराची बाब पहाता संबंधीत बांधकाम मंजुर करणाऱ्या ठरावास रद्द करण्यात यावे व ज्या न.पा.च्या इंजिनियर यांनी नियमबाहय बांधकामास स्विकृती दिली त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर रित्या पोलीस कार्यवाही तसेच सदरचे बेकायदा बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे अशी सार्वजनिक हितास्तव नम्र सुचना विनंती आहे.तसे न घडल्यास आपणा विरुध्द कर्तव्य कसुरी व अक्षम्य दुर्लक्षाचे कारणे नागरीकांच्या जिवितास धोका निर्माण करणेसह अन्य कायदेशीर बाबींचा संगनमताने सार्वजनिक हिताविरुध्द कृती केलेचे कारणे फौजदारी कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
(टिप – लालबाग शॉपींग सेंटर येथील बेकायदा बांधकामाचे फोटो
अवलोकनार्थ अर्जासोबत जोडत आहे.सदर पत्राच्या प्रति माहिती व कार्यवाहीस्तव खालील विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.

मा.प्रधान सचिव (२) साहेब, नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई
मा.प्रधान सचिव साहेब, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, महाराष्ट्र शासन, मुंबई
मा.आयुक्त तथा संचालक साो., नगरपरिषद संचालनालय, वरळी मुंबई.मा.आयुक्त साो., नाशिक विभाग, नाशिक
मा.जिल्हाधिकारी सो., जळगांव (न.पा.विभाग)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button