Chimur

ट्रकटर उलटून एक जागेवरच ठार तर 6 जण गंभीर जखमी ,तर 35 किळकोल जखमी

ट्रकटर उलटून एक जागेवरच ठार तर 6 जण गंभीर जखमी ,तर 35 किळकोल जखमी

गणपती विसर्जनानतर भक्तावर काळाचा घाला

काजळसर येथील दुर्दैवी घटना
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
जखमी मध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश, जखमींना चिमूर, नागपूर ,ब्रह्मपुरी ,चंद्रपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले

प्रतिनिधी चिमूर
।चिमूर तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या काजळसर येथे गणपती विसर्जनानंतर ट्रकटरने परत येत असताना गणेशभक्तावर काळाने घाला घातला गावाशेजारील जंगल नाक्याजवळ ट्रकटर ची ट्राली उलटून भीषण अपघात झाला यात एक महिला जागेवरच ठार झाली तर 6 जन गंभीर जखमी असून 35 जन किळकोळ जखमी झाले असून सर्वांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यात अनेक शालेय मुलांमुलींचा समावेश आहे
सविस्तर असे की नवयुवक गणेश मंडळ काजळसर यांनी मोट्या उत्साहात गणेशाची स्थापना करून मोट्या भक्तिभावाने 10 दिवस पूजा अर्चा करून आज दि 24 सप्टेंबर ला गणरायाला निरोप देण्यासाठी ट्रकटरवर गणेशाला विराजमान करीत वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढून कच्चेपार येथील नहरामध्ये विसर्जन केले यानंतर परत येत असताना दुपारी 12 वाजताच्या दरम्यान जंगल नाक्याजवळ अचानक ट्रेकटरची ट्राली पलटली आणि भीषण अपघात झाला यात प्रेमीला गुलाब श्रीरामे वय 45 वर्षे यांचे जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाले तर 6 जन गंभीर जखमी झाले 35 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले या ट्राली मध्ये अनेक जनाची उपस्थिती होती त्यात काही महिला शालेय विद्यार्थी व एक वीज पुरवठा करणारे जनरेटर होते सदर घटना ट्रकटर ला ब्रेक लावल्यामुळे जनरेटर आणि उपस्थितांची एका बाजूला वजन वाढल्याने ट्रकटर पालटला असा अंदाज वर्तविण्यात येत आहे सदर घटनेत जखमींना अनेकांना डोक्याला हाताला पायाला मार असून काहींचे पाय हात तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे सदर घटनेने काजळसर गावात एकच। हाहाकार माजला असून जो तो घटनास्थळ कडे धाव घेत होते सदर घटनेची माहिती पो पा रामटेके यांनी पोलीस स्टेशन ला देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले तात्काळ रुग्णवाहिका ला पाचारण करण्यात आले दोन रुग्णवाहिका ने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर गंभीर जखमींना उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर, ब्रम्हपुरी रेफर करण्यात आले मृतकाच्या शवाचे पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले सदर ट्रकटर उद्धवजी निकोडे यांच्या मालकीचे असून नरेश नावाचा व्यक्ती गाडी चालवत असल्याची माहितीसूत्रांकडून देण्यात आली ,पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button