Bollywood

ह्या 12 कलाकारांचा धक्कादायक आणि वाईट परिस्थितीत मृत्यू..!ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी पासून ते भगवान दादां पर्यंत..!

ह्या 12 कलाकारांचा धक्कादायक आणि वाईट परिस्थितीत मृत्यू..!ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी पासून ते भगवान दादां पर्यंत..!

मुंबई बॉलिवूड आणि मुंबई चे नाते अगदी घट्ट आहे.ह्या मायनगरीत चित्रपट सृष्टी त आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकारांनी संघर्ष केला आणि यशही मिळवले.यशाच्या उंचीवर असताना काही असे कलाकार की ज्यांचा अनपेक्षित मृत्यू कोणालाही न पटणारा आणि न आवडणारा होता.जाणून घेऊ या.. हे 12 कलाकार..!

परवीन बाबी

70 चा दशकातील बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून परवीन बाबी ला ओळखले जाते. मॉडर्न लूकमुळे प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री तिला झालेल्या आजारामुळे एकाकी पडली.
ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेली. किडनीच्या आजाराने त्रस्त झाली आणि तिचा तिच्या राहत्या घरी संशयास्पदरित्या मृत्यू झाला.ती गेली हे जवळजवळ तीन दिवसांनी माहीत झालं.

मीनाकुमारी

50 च्या दशकातील सुपरस्टार मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन या नावाने प्रसिद्ध होती. सोज्वळ आणि सोशिक भूमिका तिने केल्या. वयाच्या चौथ्या वर्षापासून बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टी काम केले. भारत भूषण, राजेंद्र कुमार, दिलीप कुमार, अशोक कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर प्रमुख भूमिका केल्या. कमाल अमरोही या प्रसिद्ध दिग्दर्शका सोबत लग्न केलं आणि तिच्या उतरत्या काळाला सुरुवात झाली.प्रचंड तणाव आणि दारूचे व्यसन यामुळे ती आजारी राहत असे.शेवटी शेवटी हॉस्पिटलचे बिल देण्याचे पैसेही तिच्याजवळ नव्हते.अन अचानक तिचा मृत्यू झाला.

अचला सचदेव

ह्या अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. नंतर पुढे चरित्र अभिनेत्री म्हणूनही काम केले. बऱ्याच सिनेमांमधून ती आईची भूमिका निभावल्या तिचा गाजलेला सिनेमा म्हणजे ‘ वक्त’. मात्र तिच्या शेवटच्या दिवसात ती एकटी होती. पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये तिचा एकाकी अंत झाला.

विमी

बी.आर. चोप्रा यांच्या यांच्या ‘ हमराज’ या सिनेमातून या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरुवात केली.ए नीले गगन के तले, धरती का प्यार पले हे तिच्यावर चित्रित झालेलं गाणं लोकप्रिय झालं होतं. पण वयाच्या 34 व्या वर्षी तिचा मृत्यू झाला.दारूचे प्रचंड व्यसन आणि सतत फ्लॉप चित्रपट यामुळे कमालीची निराशा तिला आली होती.
ती जेव्हा गेली तेव्हा तिच्याकडे ही काहीच पैसे नव्हते अगदी तिचा मृतदेह लोतगाडी तुन दवाखान्यात न्यावा लागला होता.

ए.के. हंगल

शोले चित्रपटातील इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई म्हणणारे नेहमी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे ए.के. हंगल यांचा मृत्यू देखील अत्यंत वाईट होता.अनेक प्रसिद्ध सिनेमांमधून ते लोकांसमोर आले.
या अभिनेत्याच्या आयुष्याचा शेवट देखील असाच शोकनीय झाला.
आयुष्यात पैशाची चणचण निर्माण झाली आणि अत्यंत हलाखीच्या आणि कफल्लक अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. शेवटच्या काळात त्यांच्याच बाबतीत खरा ठरला.
औषधोपचारांसाठीही पैसे नाहीत अशा अवस्थेत त्यांचा करुण अंत झाला.

भारत भूषण

हिंदी चित्रपट सृष्टीतील स्टारडम ज्या अभिनेत्यापासून सुरु झालं असं म्हटलं जातं, तो पहिला कलाकार म्हणजे भारत भूषण. अनेक हिट चित्रपट दिले त्यामुळे भरपूर यश आणि पैसे याच्या वाट्याला आले. पण ते त्याला टिकवता आले नाही. चेहऱ्याने अत्यंत साध्या वाटणाऱ्या या कलाकाराला रेसकोर्स, बेटिंग अशा गोष्टींचा नाद होता.यातच पैसे गमावले.कामही बंद झाले.इतकी हालाखीची परिस्थिती आली की एका चाळीत राहायची वेळ आली.आणि शेवटी अत्यंत वाईट स्थितीत अंत झाला.

भगवान दादा

“भोली सुरत दिल के खोटे, नाम बडे और दर्शन छोटे” या गाण्याने प्रसिद्ध असलेले भगवानदादा. एकदम लोकप्रिय अभिनेता एखाद्या हिरोच्या प्रतिमेसारखा न दिसणारा..
मोठे डोळे, स्थूल देहयष्टी आणि कमी उंची असा अवतार पण लेखक, दिग्दर्शक आणि हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांचे सिनेमे खूप चालायचे त्यांनी भरपूर पैसेही कमावले.
त्यावेळी मुंबईत जुहुला २५ खोल्यांचा त्यांचा बंगला होता. मोठ्या सात-आठ कार्स यांच्या बंगल्यासमोर उभ्या असायच्या. परंतु नंतर एकापाठोपाठ एक त्यांचे सिनेमे फ्लॉप होत गेले आणि ते कर्जबाजारी झाले.
घर आणि गाड्या त्यांना विकाव्या लागल्या, लोक त्यांना टाळू लागले. मात्र दिलीप कुमार, सुनील दत्त, ओम प्रकाश, जॉनी लिव्हर त्यांना भेटायला जायचे.
परंतु त्यांनी कोणाकडून मदत घेतली नाही. नंतर त्यांनाही त्यांच्या आयुष्याचा शेवट एका चाळीतच झाला.

नलिनी जयवंत

जुन्या काळातील एक ग्लॅमरस चेहरा. १९४०-५० च्या दशकात या अभिनेत्रीने आपल्या अदांनी आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले. कालापानी, राही, शिकस्त असे अनेक गाजलेले सिनेमे तिच्या नावावर आहेत.
परंतु दुसऱ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिने स्वतःला लोकांपासून अलिप्त केले अत्यंत एकाकी जीवन नंतर तिने व्यतीत केले तिचा मृत्युही अत्यंत कफल्लक अवस्थेत झाला.

महेश आंनद

नव्वदच्या दशकातील खलनायकी चेहरा म्हणून महेश आनंद बऱ्याच जणांना आठवत असतील. शहेनशहा, मजबूर, ठाणेदार, गंगा जमुना सरस्वती हे त्यांनी भूमिका केलेले काही चित्रपट.
परंतु अचानक त्यांच्याही बाबतीत असंच काहीतरी झालं आणि त्यांना हिंदी सिनेमांमध्ये काम मिळेनाशी झाली अत्यंत कफल्लक अवस्थेत ते दहा वर्षे राहिले.
पैशांची गरज म्हणून पेहलाज निहलानी यांच्या रंगीला राजा’या सिनेमात एक छोटीशी भूमिका केली, पण नंतर त्यांचा मृत्यू झाला.

सीताराम पांचाळ

पिपली लाईव्ह, स्लमडॉग मिलेनियर अशा सिनेमांमधून काम केलेले सिताराम पांचाळ यांनाही कॅन्सर झाल्यामुळे पुढे सिनेमात कामं मिळालीच नाहीत.
आणि कॅन्सरच्या उपचारांसाठीही पैसे नाही अशा अवस्थेतच त्यांचा अंत झाला.

श्रीवल्लभ व्यास

लगानमध्ये ईश्वरकाकांची भूमिका करणाऱ्या या अभिनेत्याला सिनेमाचं शूटिंग करताना ब्रेन स्ट्रोकआणि पॅरालिटिक अटॅक आला.
नंतर त्यावर उपचार करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

माणिक इराणी

नव्वदच्या दशकातील हा अजून एक खलनायकाची भूमिका जवळपास २५० चित्रपटातून त्याने काम केले. पुढे दारूच्या आहारी गेल्याने त्याला लिव्हरचा त्रास झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
जेव्हा तो गेला त्यावेळेस तो ओळखूही येत नव्हता, इतका तो अशक्त झाला होता.

बॉलिवूडमधील हे सेलिब्रिटी कधीकाळी प्रसिद्धीच्या झोतात होते, मात्र मिळणारं यश टिकून ठेवू शकले नाहीत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button