Amalner

शिरूड सह कावपिंप्री शिवारातून 5 गुरांची चोरी..!

शिरूड सह कावपिंप्री शिवारातून 5 गुरांची चोरी..!

अमळनेर तालुक्यातील शिरूड, कावपींप्री व इंद्रापिंप्री शिवारातून एकाच दिवशी ५ गुरे चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अमळनेर तालुक्यात सातत्याने चोऱ्या होत असून आता तर शेळ्या मेंढ्या आणि गुरेही चोरीला जाऊ लागली आहेत. परिणामी तालुक्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगीराज निंबा पाटील रा.इंद्रापिंप्री यांच्या मालकीची बैलजोडी खळ्यात बांधलेली होती. १७ रोजी रात्री साडे अकरा वाजेला चारा पाणी करून झोपल्यावर सकाळी पहाटेच्या सुमारास बैलांची जागा बदलवण्यासाठी गेले असता बैल जोडी आढळून आली नाही. त्यांनी घडलेला प्रकार गावात सांगितला असता त्यांचे काका सुनिल बारीकराव पाटील यांची गोठ्यात बांधलेली गाय ही दिसून आलेली नाही.ह्या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना सांगितली आणि गुरे शोधण्यासाठी कावपिप्री व शिरूड येथे गेले असता शिरूड येथील पंकज भिला पाटील व भैय्या साहेबराव पाटील यांचा एक असे दोन बैल शिरूड येथेही सापडत नसल्याचे निदर्शनास आले .

याप्रकरणी योगीराज पाटील यांनी फिर्यादी वरून अमळनेर पोलिसात अज्ञात विरुद्ध भादवी कलम ३६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जनार्दन पाटील करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button