India

आरोग्याचा मुलमंत्र..लघवी च्या रंगात दडलय तुमच्या आरोग्याच रहस्य

आरोग्याचा मुलमंत्र..लघवी च्या रंगात दडलय तुमच्या आरोग्याच रहस्य

आपले आरोग्य अनेक आजारांनी त्रासलेले असते. काही आजारांची लक्षणे स्पष्टपणे दिसतात अथवा जाणवतात, अशावेळी त्यावर त्वरीत उपचार करून हे आजार आटोक्यातही येतात. मात्र अनेकवेळा आजारांची लक्षणे दिसून येत नाहीत, किंवा काही काळानंतर ती लक्षात येतात. अशावेळी उपचारांसाठीही वेळ लागतो. मात्र तुम्हाला माहित आहे तुमच्या लघवीच्या रंगवरुनही तुमचे आरोग्य कसे आहे किंवा तुम्हाला कोणता आजार आहे का ते ओळखता येते. लघवीचा रंग हा नेहमीच बदलत असतो, युरीनच्या रंगावरून आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते असे ब्रिटनच्या विंडसर युरोलॉजीचे युरोलॉजिस्ट डॉ. मार्क लैनियाडो यांनी सांगितलं आहे. चला तर पाहूया काय सांगतात हे रंग..

पिवळा रंग : तुम्ही निरोगी आहात.

गडद पिवळा : तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता आहे. तुम्हाला त्वरित पाणी प्यायला हवे.

केशरी किंवा ऑरेंज : यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता तसेच मिठाची मात्रा अधिक झाल्याचे समजावे. कधी कधी हे काविळीचेदेखील लक्षण मानले जाते.

निळा : याचा अर्थ काही जीवाणूंचा संसर्ग तुम्हाला झालेला आहे. प्रमाणात केक किंवा त्यावरचे आयसिंग खाल्ल्याने थोडक्यात अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने हा रंग येऊ शकतो.

ब्राऊन किंवा काळसर : एलकॅप्टॉनोरीया या दुर्मिळ अनुवंशीक विकारामध्ये लघवीचा रंग ब्राऊन अथवा काळसर होतो.

लाल रंग : हा रंग लघवी मध्ये रक्ताची मात्रा असल्यामुळे होऊ शकतो. तुम्हाला किडनी, ट्युमर किंवा प्रोस्टेट आजार असल्याचे संकेतही हा रंग देतो. तसेच लघवीतून रक्त जात असेल तेव्हाही लघवीचा रंग लाल होतो.

लघवीचा वास येणे : लघवीला येणारा वास हादेखील आजारांसंदर्भातील तसेच शरीरातील बदलांसंदर्भातील सूचना देत असतो. हिरव्या भाज्यांचे अतिसेवन केल्याने लघवीचा वास बदलतो, लघवीत संसर्ग झालेला असेल तर वासाची तीव्रता वाढते, लघवीतून गोड वास येत असेल तर ते मधुमेहाचे लक्षण मानले जाते, बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग आणि वास यांवर परिणाम होतो.कधी कधी डॉक्टर आपल्याला इतकं स्ट्रॉंग औषध देतात की, ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग नारंगी, पिवळा होतो. त्यासोबतच जे लोक गाजर खातात, त्याचा रस पितात त्यांच्याही लघवीता रंग नारंगी होतो. अशात घाबरण्याची गरज नाही.दुधाळ पांढर्‍या लघवीचा रंग :
दुधाळ पांढर्‍या रंगाचे लघवी हे शरीरातील मूत्रसंसर्ग किंवा किडनी स्टोनचे लक्षण असू शकते. या प्रकरणात, डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.लघवी करताना कोणताही त्रास किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यास सुरुवात करायला हवी. विशेष म्हणजे पाणी कमी पिल्याने लघवीचे आजार सुरू होतात. त्यामुळे पाणी पिण्याचा कंटाळा करू नये आणि पाणी भरपूर प्यावे, जेणेकरून शरीरातील तापमान सामान्य राहून आजारांना अटकाव करण्यास मदत होईल.डॉ किशोर बाळासाहेब झुटे पाटील
( होमिओपॅथीक तज्ञ )

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button