Mumbai

राज्याचे राज्यपाल महामहीम आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारीजी साहेब यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितीन पवार यांनी आदिवासी विधानसभा सदस्यांसोबत भेट घेतली.

राज्याचे राज्यपाल महामहीम आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारीजी साहेब यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितीन पवार यांनी आदिवासी विधानसभा सदस्यांसोबत भेट घेतली.

मुंबई : आज राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम आदरणीय श्री भगतसिंग कोश्यारीजी साहेब यांची महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितीन पवार यांनी आदिवासी विधानसभा सदस्यांसोबत भेट घेतली.
यावेळी प्रामुख्याने कळवण सुरगाणा या 100% टक्के आदिवासी मतदारसंघातील वननिवासी व इतर पारंपारिक वननिवासी यांना हक्काचा स्वतंत्र सातबारा मिळण्यासाठी आमदार नितीन अर्जुन पवार यांनी महामहिम राज्यपाल यांच्या कडे आग्रहाची मागणी केली. तसेच सध्यास्थितीत वनपट्टे कसत असलेल्या आदिवासींना त्यांच्या हक्काचे प्रमाणपत्र व ताब्यात कसत असलेली वनजमीन मिळण्‍यासाठी देखील निवेदन केले. सुरगाणा-कळवण मतदारसंघांमध्ये कुठलीही लघुपाटबंधारे योजना किंवा छोटे-मोठे बंधारे व तलाव बांधण्यासाठी विशेषता सुरगाणा तालुक्यात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी फॉरेस्ट विभागाचे नियम व अटी यामध्ये शिथीलता करून पाणीटंचाईमुळे बंधारे, लघू पाटबंधारे तलाव, पाझर तलाव, गाव तलाव बांधकाम करण्यासाठी महामहिम राज्यपाल यांच्यामार्फत कायदा करण्यात यावा अशीदेखील विनंती केली. यावेळी राज्याचे महामहिम राज्यपाल यांनी सदर प्रश्नांवर लवकरच तोडगा काढून आदिवासींना न्याय देणार असल्याचे भाकीत केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button