Amalner

न प त नगरसेवकांच्या नातेवाईकांचे दबावतंत्र..!नगरसेवक आहात मग तुमच्या सर्व नातेवाईकांनाच मिळतील सर्व कामे…!अजबगजब कारभार…

न प त नगरसेवकांच्या नातेवाईकांचे दबावतंत्र..!नगरसेवक आहात मग तुमच्या सर्व नातेवाईकांनाच मिळतील सर्व कामे…!अजबगजब कारभार…

अमळनेर येथील नगर परीषदेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून लोक कल्याणकारी कामांसाठी ही नगरपरिषद नसून फक्त स्व हिता साठी असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहरात रंगली आहे.अमळनेर नगरपरिषदेच्या भ्रष्टाचारी प्रशासनाची कारकीर्द सर्वांनाच ज्ञात आहे.माजी मुख्याधिकारी गायकवाड मॅडम यांनी बदली झाल्यानंतर एका रात्रीत किती सह्या केल्या हे सर्वांनाच माहीत आहे.अमळनेर न प त महिला नगराध्यक्षा असून ही त्या कधीही कुणालाही दिसत नाहीत तीच परंपरा महिला नगरसेवकांनी सुरू ठेवली आहे.अमळनेर न प तील महिला नगरसेवक यांच्या नातेवाईकांचा प्रचंड वावर वाढला असून नगरपरिषद कर्मचारी प्रचंड दबावाखाली कामे करीत आहेत.सर्व टेंडर,बांधकाम कामे हे नगरसेवकांच्या नातेवाईकांना दिले जात आहे. टेंडर आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची बिले काढण्यासाठी नगरसेविका यांचे चिरंजीव तसेच काही नगरसेवक यांचे भाऊ तर काहींचे स्वयंघोषित नगरसेवक पतिराज नगरपरिषद प्रशासनावर दबाव ठेऊन आहेत . कारण आता नगरपालिका फक्त 40 दिवस सत्ताधारी यांच्या ताब्यात राहणार आहे.त्यानंतर प्रशासन बसल्यावर कुणाचीही मनमानी चालणार नाही. सर्व कामे नियमात चालतील. म्हणून आहे तितके ओरबाडण्याची नियत ठेवून जास्तीत जास्त कामे पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. ह्या नादात त्यांना नगरपालिका शासन परिपत्रक क्र. जीईएन -1093/1345/प्र. क्र.106/93/नवी -14 दि.20 जुलै 1993 या नियमाची आठवणच पडलेली दिसते. आता मुख्याधिकारी या शासन जि.आर अनुषंगाने न. पा. च्या कर्मचाऱ्यांचे ह्या दबावातून सुटका करणार का? ह्या विषयाची चर्चा गावात सुरु आहे.

लोका शिकवी ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण असेच काहीतरी नगरपरिषद अमळनेर मध्ये घडताना दिसून येत आहे.असाच प्रकार आज अमळनेर न प त घडून आला आहे आणि रोज घडत आहे.अमळनेर न प प्रशासन राजभवन मध्येच सुरू असत.नशीब कर्मचाऱ्यांना नगरसेवक घरी बोलवत नाही. कारण असाही अमळनेर चा विरोधी पक्ष काही कामाचा नाही त्यामुळे बिचारे कर्मचारी आणि अधिकारी गुपचूप आहेत.कारण त्यांचा आवाज उठविणारे च कोणी राहिले नाही. विरोधी पक्ष देखील राजभावनच्या दावणीला बांधलेला आहे.त्यामुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सध्या अमळनेर न प त सुरू आहे.कस हे ठरलेले आहे ना तू आणि मी भाऊ भाऊ सर्व मिळून एकत्र खाऊ..!पण अमळनेर ची जनता सुजाण आहे आणि ह्याचा हिशोब देखील ठेवून आहे.लवकरच अमळनेर न प च्या निवडणुकांचे रण शिंग वाजणार आहेत त्यात जनता योग्य काय तो निर्णय घेईलच..!ये पब्लिक है ये सब जानती हैं.. ये पब्लिक हैं बाबू…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button