Ahamdanagar

महाभारतातील अर्जुनाने ज्या ठिकाणी गायी सांभाळल्या ते घोटण येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात जाउनही धार्मिक कार्यात ग्रामस्थच अग्रेसर!

महाभारतातील अर्जुनाने ज्या ठिकाणी गायी सांभाळल्या ते घोटण येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या ताब्यात जाउनही धार्मिक कार्यात ग्रामस्थच अग्रेसर!

सुनिल नजन अहमदनगर

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र घोटण येथील महाभारतील पांडव कालीन मल्लिकार्जुनेश्वर मंदिर हे पुरातत्व खात्याने ताब्यात घेऊन विकास कामांना सुरुवात केली आहे.परंतु अनेक वर्षांपासून परंपरेने चालत आलेले वर्षभरातील अनेक धार्मिक पार पाडण्यासाठी सर्वच ग्रामस्थ सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अग्रेसर असल्याचे दिसून येते. श्रावणी सोमवार, महावीर जयंती, आणि महाशिवरात्री हे या मंदिरातील प्रमुख कार्यक्रम आहेत. आता दर सोमवारी खिचडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे हे ग्रामस्थांनी जाहीर केले आहे.ज्यांना महाप्रसादाच्या पंगती घ्यायच्या असतील त्यांनी संयोजकाशी संपर्क साधावा. आधिकमास आणि श्रावणात दोन महीने हे मंदिर भाविकांनी फुलुन गेले होते. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मोठा महोत्सव साजरा केला जातो. यावर्षी ही तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.काकड आरती,पंचारती,भजन, किर्तन,पेढ्यांचा महानैवेद्य, मंदिरावर आकर्षक रोषनाई, कुस्त्यांचा जंगी हंगामा ,आणि नवसाच्या पाच क्विंटल शाबुदाणा खिचडीच्या महाप्रसादाच्या पंगतीने हा मंदिर परीसर भाविकांच्या गर्दीने फुलुन गेला होता. गावातील प्रमुख कुस्ती प्रेमी पंचमंडळी तर्फे महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता. पैलवान दामोदर घुगे,संजय मोटकर,सर्जेराव ढाकणे, रणजीत घुगे, प्रकाश घुगे, शहादेव घुगे, पंढरीनाथ जगधने,श्रीकांत सोनवणे, सचिन घुगे, हनुमान टाकळकर, अर्जुन घुगे, संकेत कचरे, विष्णु घुगे, मुरलीधर थोरवे, नामदेव घुगे, शिवाजी क्षिरसागर, नितीन आव्हाड, श्रीकृष्ण क्षिरसागर,यांनी हंगामा भरवण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने विशेष परिश्रम घेतले. या मंदिराच्या देखभालीसाठी पुरातत्व खात्याने नेमलेले प्रमुख अधिकारी राजेश डुगलज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले.महाभारतातील अर्जुनाने या ठिकाणी गाया सांभाळून त्यांच्या साठी गोठे बांधले होते म्हणून या गावाला शब्दाचा अपभ्रंश होउन “घोटण”हे नाव पडले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button