Ahamdanagar

“तोतया पत्रकार “आणि “झिरो पोलीस” यांना मालगाडी चालकाकडून हप्ते वसुली करताना चकलंबा पोलिसांनी रंगेहाथ पकडले!

“तोतया पत्रकार “आणि “झिरो पोलीस” यांना मालगाडी चालकाकडून हप्ते वसुली करताना चकलंबा पोलिसांनी रंगेहाथ पकडले!

सुनिल नजन/अहमदनगर

मोटारसायकल सह चारचाकी गाड्यावर “प्रेस,पोलिस”ही अद्याक्षरे टाकून संपूर्ण महाराष्ट्रात जनतेची सर्वत्र सर्रासपणे लुट केली जात आहे. याचा एक नमुना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पहावयास मिळाला. २२२ या राष्ट्रीय महामार्गावर एक तोतया पत्रकार आणि एक झीरो पोलीस आणि एक त्यांचा सहाय्यक साथीदार यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील टेंपो क्र. MH 20 EL 5570 हा मालवाहतूक करीत गेवराई तालुक्यातील फुलसांगवी गावातून जात होता. या टेंपोस फुलसांगवी येथील दिपक अनंता तळेकर, सुर्यकांत पोपट काशिद, आणि हाजीपूरा येथील राहुल रुद्राक्ष उगले या तिघांनी तोतया पत्रकार, झीरो पोलीस आणि सहाय्यक अशी खोटी नावे धारण करीत थांबविले आणि टेंपो चालकाकडे आम्ही पत्रकार, पोलीस, आणि सहायक पोलीस आहोत अशी बतावणी करीत टेंपो चालक विष्णु शेषराव सुरवसे रा.सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद यांच्या कडून पोलीसी हप्ता म्हणून जबरदस्तीने 1800 रुपये काढून घेतले.ही घटना रविवार दिनांक 30/7/2023 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. मग टेंपो चालक विष्णु सुरवसे यांनी सोमवार दिनांक 31/7/2023 रोजी सकाळी थेट चकलंबा पोलीस स्टेशन गाठून गुन्हा रजिस्टर नंबर 222/2023 भारतीय दंडविधान संहिता कलम 170,341,392,34 प्रमाणे अज्ञात व्यक्ती च्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रस्ता लुटीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन ए पी आय एकशिंंगे यांनी परिसरातील दुकानातील सी सी टी व्ही कँमेऱ्याचे फुटेज तपासून संशयित आरोपींना शोधून काढत त्यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी पोलीसी खाक्यातील चौदावे रत्न दाखवताच संशयित आरोपी पोपटा सारखे गोड गोड बोलू लागले आणि माराच्या भितीने गुन्हा केल्याचे कबूलही केले.गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा शाईन कंपनीची अंदाजे 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल आणि फिर्यादी चालकाकडून जबरदस्तीने काढून घेतलेले 1800 रुपये असा एकूणच 51हजार 800 रुपये किमतीचा मुद्दे माल पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला आहे. गेवराईचे डी.वाय.एस.पी.निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नारायणराव एकशिंगे, पि.एस.आय. इंगळे, हवालदार बारगजे, पो.काँ.मिसाळ, पो.काँ. घोंगडे यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सदरची कारवाई केली आहे. गुन्हा शोध मोहीम आणि गुन्हेगारी प्रतिबंधक उपाय योजना करून तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या मुळे चकलंबा पोलीस स्टेशनच्या धडाकेबाज अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परीसरातील गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांवर जबरदस्त वचक निर्माण झाला आहे. तसेच पत्रकारांच्या नावाने तोतयेगीरी करणारे आणि पोलिसांच्या नावाने झिरो पोलीस म्हणून मिरवणारे यांच्या डोळ्यातही झंनझनीत अंजन घातले गेले आहे. पोलिसांनी” प्रेस ” आणि” पोलिस”ही अद्याक्षरे असलेल्या सर्व वाहनांची कसुन तपासणी करुन चौकशी केल्यास अनेक बोगस आणि तोतयेगीरी करणारे महाभाग गजाआड होतील. सर्वोच्च न्यायालयाने वाहनावर” पोलीस”ही अद्याक्षरे लिहण्यास बंदी घातली असताना ही अनेक वाहनावर पोलीस ही अद्याक्षरे राजरोसपणे लिहलेली दिसतात. तसेच पत्रकार नसतानाही वाहनावर “प्रेस “ही अद्याक्षरे लिहून अनेक भामटे तोतयेगीरी करत आहेत त्यांच्या ही पोलिसांनी मुसक्या आवळल्या पाहिजेत म्हणजे समाजातील समाजकंटकांच्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीला आळा बसेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button