Amalner

भारतमातेचे सुपुत्र शहीद गणेश सोनवणे यांचे अंतिम संस्कार उद्या पातोंडा येथे शासकीय व सैनिकी इतमामात होतील..

शहीद गणेश सोनवणे चे अंतिम संस्कार उद्या पातोंडा येथे शासकीय व सैनिकी इतमामात होतील..

पातोंडा येथील जवान गणेश भिमराव सोनवणे (वय ३६) यांचे जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असताना दि.५ ऑक्टोबरला आकस्मित निधन झाले. जवान गणेश यांच्या निधनाची बातमी कळताच कुटूंबांवर व गावावर शोककळा पसरली आहे.

गणेश हा 14 मराठा बटालियन मध्ये सेवेत होता.16 वर्ष 9 महीने देश सेवेसाठी ह्या जावनाने दिली. येत्या डिसेंबर महिन्यात 17 वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होता.परंतु त्याअगोदरच सेवेत असताना त्याचे निधन झाले आहे. वयाच्या 20 व्या वर्षी गणेश देशसेवेत दाखल झाला होता. त्याचा देह (शव) आर्मीचे सर्व शासकीय इतमामात विमानाने मुंबईत आणि तेथून रुग्णवाहिकेने सैनिकी निगराणी आणि इतमामात पातोंडा येथे येणार आहे. त्या करीता सर्व आवश्यक बाबींची पूर्तता झाली आहे.
उद्या 7 तारखेला शहीद गणेश यांच्यावर पातोंडा येथेच सर्व शासकीय इतमामात अंतिम संस्कार होतील. गणेशच्या पश्चात आई, पत्नी सीमा, दोन मुली प्रांजल 12 वर्ष व पिऊ 9 वर्ष असा परीवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button