Faijpur

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

भारतीय सैन्य जगातील सर्वोत्तम सैन्यापैकी एक – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

भारतीय सैन्य दुर्दम्य इच्छाशक्ती, शौर्य आणि बलिदान यांचा त्रिवेणी संगम असून जगातील बलाढ्य देशांना सुद्धा भारतीय सैन्य आदर्शवत व प्रेरणादायी आहे. अत्यंत बिकट व प्रतिकूल परिस्थितीतही देशाच्या रक्षणासाठी भारतीय सैन्य सदैव तत्पर असते. अशा सैन्याप्रती प्रत्येक भारतीयाने अभिमान व आदर बाळगला पाहिजे असे आवाहन लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एकका च्या वतीने आयोजित भारतीय सैन्य दिवसाच्या औचित्याने आयोजित ऑनलाइन वेबिनार मध्ये बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी व समादेशक अधिकारी, 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव कर्नल प्रवीण धिमन यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना एककाचे अधिकारी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी 74 व्या सैन्य दिवसाच्या औचित्याने वेबिनार हे आयोजन केले होते.
यात 28 कॅडेटस ने सहभाग नोंदवला. कोरोनाविषाणू प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, बटालियन व महाविद्यालयाने पारित केलेल्या नियम व अटी न च्या आधीन राहून हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.
यात लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत यांनी भारतीय सैन्य दिवसाचा इतिहास सांगितला. जनरल (फिल्ड मार्शल) करिअप्पा यांना 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय सैन्याचा चीफ म्हणून नियुक्त करण्यात आले या औचित्याने दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सैन्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी भारतीय सैन्यात शौर्य व पराक्रम गाजवणाऱ्या अधिकारी व सैनिकांचा विविध पदके देऊन सन्मान करण्यात येतो. आपण स्वतःच्या घरात सुरक्षित आहोत कारण आपल्या देशाच्या सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितित रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपला सैनिक मातृभूमीचे रक्षण करीत आहे. म्हणून प्रत्येकाने भारतीय सैन्याप्रती आदर व सन्मान राखला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष श्री शिरिष दादा चौधरी, आमदार रावेर विधानसभा मतदार संघ व सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सर्व सन्माननीय उपप्राचार्य, कर्नल प्रवीण धीमन लेफ्ट कर्नल पवन कुमार, सुभेदार मेजर कोमलसिंग, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व कॅडेटसने मार्गदर्शन केले आणि परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button