India

आरोग्याचा मुलमंत्र..मोहरीच्या तेलाचे विविध उपयोग

आरोग्याचा मुलमंत्र..मोहरीच्या तेलाचे विविध उपयोग

मोहरीचे तेल (वनस्पती) बियाण्यामधून काढले जाते. त्याचे वैज्ञानिक नाव ब्रासिका जुन्सा आहे, जे वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. त्याला इंग्रजीत Mustard Oil , तेलगूमध्ये अवान्युन, मल्याळममधील कदुगेना आणि मराठीत मोहरी असे म्हणतात.

नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अँसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.

१. त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी :
त्वचेतील मॉईस्चराईजर बऱ्याचदा कमी होत असते. ज्यामुळे त्वचेवरील तजेलपणा कमी झाल्याचे कळते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीच्या तेलामध्ये असणारे ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई याचे प्रमाण जास्त असल्याने तुमची त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी उपयोग होतो. काही जणांना याचा वास आवडत नाही. मात्र याचे गुणधर्म अधिक चांगले असल्याने तुम्ही किमान आंघोळीच्या आधी अर्धा तास हे तेल त्वचेला लाऊन ठेवा आणि नियमित याचा वापर केल्यास, तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

२. हाडांच्या मजबूतीसाठी :
यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. तुम्ही नियमित स्वरूपात या तेलाने मालिश करत राहिल्यास, तुम्हाला हाडांची समस्या निर्माण होणार नाही. तसेच तुम्हाला सांधेदुखीचा त्रासही होणार नाही. हाडांची मजबूती तुम्हाला अनेक वर्षांसाठी हवी असेल तर तुम्ही नियमित मोहरीच्या तेलाने योग्य मसाज करून घ्या. हा मसाज किमान आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित करून घ्यायला हवा.

३. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी :
मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी हे तेल उपयुक्त ठरते. तसंच हृदय निरोगी राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपल्या शरीरात काही ना काही कारणाने अनेक विषारी पदार्थ जात असतात. पण त्याचा आपल्याला काय त्रास होतोय हे वेळेवर कळत नाही. मग अशावेळी आपण आपल्या रोजच्या जेवणात काही प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

४. अँटिएजिंगसाठी परिणामकारक :
मोहरीच्या तेलाने त्वचेला अधिक चांगले फायदे मिळतात. विशेषतः वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो. वास्तविक एका शोधानुसार मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. चेहर्‍यावर सुरकुत्या पडत असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. मोहरीचे तेल तुम्ही नियमित वापरून आपली त्वचा अधिक तजेलदार आणि टवटवित ठेऊ शकता. तसेच हे एक नैसर्गिक औषध असल्यामुळे याचा तुमच्या त्वचेला कोणताही त्रास होत नाही.

५. टॅनिंग घालविण्यासाठी :
मोहरीच्या तेलात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून यामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अँसिडही असल्यामुळे त्वचेवर येणारे टॅनिंग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. टॅनिंगमुळे त्वचा काळसर होते. मात्र मोहरीच्या तेलाने हा काळसरपणा काढून टाकता येतो. नियमित या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंगची समस्स्या दूर होण्यास मदत होते.

६. फंगल इन्फेक्शन काढण्यासाठी :
मोहरीचे तेल हे किटक निवारणासाठीही उपयोगी ठरते. अर्थात त्वचेवर फंगल इन्फेक्शन असेल तर याचा उपयोग करून घेता येतो. हे गुणकारी तेल त्वचेवरील अन्य किडे दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. यातील एडीज एल्बोपिक्टस डासांनादेखील आपल्या शरीरापासून दूर ठेवते. एका शोधातून हे सिद्ध करण्यात आले आहे. त्याशिवाय फंगल इन्फेक्शनचा होणारा त्रास कमी करण्यासाठीही मोहरीच्या तेलाचा उपयोग होतो.

७. केसांसाठी उपयोगी

बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे तेवढेच चांगले फायदेही अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यासाठी उपयोग होतो.

डॉ. किशोर बाळासाहेब झुटे पाटील
[ होमिओपॅथिक तज्ञ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button