Pune

महात्मा फुलेनगर शाळेत आनंदी बाजार

महात्मा फुलेनगर शाळेत आनंदी बाजार

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महात्मा फुलेनगर या ठिकाणी लहानग्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ असा आनंदी बाजार भरविला होता ,,, या आनंदी बाजाराचे उदघाटन कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक श्री मच्छिंद्र अभंग यांच्या हस्ते व पूजन श्री सूर्यवंशी सर मुख्याध्यापक महात्मा फुले विद्यालय यांच्या हस्ते झाले ,,, या कार्यक्रमात भाजी मंडई व खास खाऊ गल्लीचे आयोजन करण्यात आले होते. मुलांनी ताजा ताजा भाजीपाला आणला होता पालकांनी ही खूप सहकार्य केले ,, खाऊ गल्ली मध्ये पाणीपुरी ,इडली ,डोसा, वडापाव ,भेळ असे स्टॉल लावण्यात आले होते .

महात्मा फुलेनगर शाळेत आनंदी बाजार

शेजारील हायस्कूल मधील विद्यार्थी , ग्रामस्थ ,कारखान्यातील कर्मचारी ,, शिक्षक बांधव यांनी आनंदी बाजारासाठी चांगला प्रतिसाद दिला .हा बाजार भरवण्यामागे विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वृद्धिंगत करणे,, व्यावसाय विषयक आत्मीयता निर्माण करणे , पैशाचे छोटे व्यवहार करता येणे , प्रामाणिक पणा , मेहनत या गुणांची रुजवणूक करणे हा हेतू होता . या कार्यक्रमासाठी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ ज्योती गायकवाड मॅडम यांनी प्रत्येक स्टॉल चे नियोजन केले होते तर सौ लता लावंड मॅडम यांनी आनंदी बाजार विषयी प्रत्येक पालक व ग्रामस्थ यांचे पर्यंत माहिती पोहचवली , श्री रवींद्र तनपुरे सर यांनी स्टॉल लावण्याची व्यवस्था व फलकलेखन केले .

महात्मा फुलेनगर शाळेत आनंदी बाजार

मुख्याध्यापक श्री अनिल गायकवाड सर यांनी प्रशासकीय बाबी व येणारे सर्व मान्यवर यांचा स्वागत सत्कार केला .या छोटेखानी उपक्रमातून अंदाजे एकूण 15 ते 16 हजार रुपयांचे व्यवहार करण्यात मुलांनी यश मिळवले , शेवटी उपस्थित सर्वांचे ,शाळा व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांचे वतीने श्री तनपुरे सर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button