सोलापूर

ठाकरे मंत्री मंडळात सोलापूरचा एकही चेहरा नाही ..

ठाकरे मंत्री मंडळात सोलापूरचा एकही चेहरा नाही ..

सोलापूर दत्ता पारेकर

आज झालेल्या पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात सोलापुरातील एकाही आमदारांचा समावेश न झाल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता तब्बल आठवडाभरापासून लागली होती.काँग्रेस च्या कोट्यातून सोलापूर शहर मध्य च्या आमदार प्रणितीताई शिंदे, राष्ट्रवादी च्या कोट्यातून माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, तसेच सेनेचे परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल असे बोलें जात होते.परंतु सोमवारी राज्यपालांना सादर केलेल्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराचे नाव नसल्याने पूरती निराशा झाली.
पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद मिळणार अशीही चर्चा होती पण याबाबत इतर माहिती मिळाली नाही.पण सोलापूरकरांच्या पदरी निराशा पदरी पडली म्हणायला हरकत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button