सोलापूर

कृष्णात गायकवाड यांना पुरस्कार जाहीर

कृष्णात गायकवाड यांना पुरस्कार जाहीर

सोलापूर ; राहुल खरात

स्व. हरिश्चंद्र फाऊंडेशन (रजि.) महाराष्ट्र राज्य संस्थापक व स्नेहबंध वाचनालय व स्नेहबंध सन्मान सोहळा कमिटी चेअरमन आणि बृहन्मुंबई मनपाच्या शिक्षण विभागात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असणारे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील भोसे येथील श्री कृष्णात रामचंद्र गायकवाड यांना एकता सेवाभावी संस्था, परभणी यांच्या वतीने यंदाचा ” राज्यस्तरीय गुरूगौरव पुरस्कार 2019 ..” जाहीर झाला आहे..!!
तसेच,आनंदश्री फाऊंडेशन डोंबिवली यांचा “…महात्मा गांधी दर्शन पुरस्कार..”
व समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर यांचादेखील “…राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार…” जाहीर झाला आहे….!! नुकताच त्यांना नागपूरचा समाजभूषण पुरस्कार, नळदुर्ग येथील ज्ञानकिरण गुणगौरव पुरस्कार ,तसेच राज्यभरातील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे
मुंबईत राहून नोकरी सांभाळून , जीवनात संघर्षमय प्रवास करत राज्यभरातील अनेक उपेक्षित,वंचीत व आर्थिक मागास गोरगरिबांना हरिश्चंद्र फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच मदत करत असतात..!!
गायकवाड यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बृहन्मुंबई शिक्षण विभाग, संगीत व कला अकादमी , विविध सामाजिक,कला,क्रीडा तसेच शिक्षण संस्था,आणि विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे…!!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button