सोलापूर

सोलापूर जिल्हयात अल्पसंख्यांक समाजाचे 5000 कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षसंघटन मजूबत करणार – फारूक मटके जिल्हाध्यक्ष

सोलापूर जिल्हयात अल्पसंख्यांक समाजाचे 5000 कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षसंघटन मजूबत करणार – फारूक मटके जिल्हाध्यक्ष

प्रतिनिधी
(रफिक आत्तार)

सोलापूर – सोलापूर जिल्हयात अल्पसंख्यांक समाजातील 5000 कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून पक्षसंघटन मजूत करावे असे आवाहन जिल्‍हाध्यक्ष फारूक मटके यांनी सोलापूर जिल्हयाच्या अल्पसंख्यांक विभागाच्या पंढरपूर येथे आढावा बैठकीत बोलताना म्हणाले. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभागाचे अल्पसंख्यांक निरिक्षक हुजूरभाई ईनामदार हे होते. सदरच्या बैठकीत बोलताना मटके पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्हियातील 11 तालुक्यात अध्यक्ष नेमण्याचे काम चालु असून प्रत्येक तालुक्या्ची कार्यकारणी किमान 51 पदाधिका-यांची असावे हे आवाहन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजासाठी असलेल्या योजनांची माहिती सुध्दा सर्व पदाधिका-यांना देण्यात आली. सोलापूर जिल्हायात अल्पसंख्यांकसमाजाच्या जे काही अडीअडचणी असतील त्यांनी सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक विभागाच्या पदाधिका-यांना संपर्क साधावे व त्यांना त्याचा पाठपुरावा त्यांना मदत करावे असे आदेशित केले.
पक्षाचे अल्पसंख्यांक निरिक्षक हुजूरभाई ईनामदार यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणूकीत व पडत्याकाळात पक्षाचे कोणतेही लाभ न घेता एकनिष्ठपणे पक्षाच्या अहोरात्र काम करणा-यांना कार्यकर्त्यांनाच कार्यकारणीमध्ये प्राधान्य द्यावे व येणा-यां काळात महामंडळ व इतर महत्वाच्या पदांवर अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांवर कोणतेही अन्याय होवू देणार नाही असे आश्वासन दिले. सदरच्या बैठकीत नवीन पदाधिका-यांना निवड करून त्यांना पुढील कारर्किदिस शुभेच्छा देवून सर्व नुतन पदाधिका-यांचा हुजूरभाई ईनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरच्या बैठकीत अल्पसंख्यांक महाराष्ट्र सरचिटणीस सलीम मुलाणी, कार्याध्यक्ष, महमद मुलाणी, मोहसिन तांबोळी, जिल्हा सरचिटणीस जुबेर हमीद बागवान, तालुका अध्यक्ष पैगंबर शेख, बार्शी तालुका अध्यक्ष सादीकभाई पठाण, अकबर शेख, ओ.बी.सी. जिल्हा सरचिटणीस बाबु पटेल, भैय्या पठाण, जहांगीर राजु तांबोळी टेंभूणी, करीम तांबोळी, मुंढेवाडीचे उपसरपंच अतिक मेंबर, सर्फराज शेख, रेहान बागवान ,साजिद हाजी नजिर बागवान,यासिन बागवान,आकिल बागवान,तसेच सोलापूर जिल्हयातील अल्पसंख्यांक विभागचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस जुबेर हमीद बागवान यांनी केले तर आभार पंढपूर तालुकाअध्यक्ष पैंगबर शेख यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button