Mumbai

राज्यात पुन्हा टेन्शन वाढले, ओमायक्राँन मुळे सापडले तब्बल नवे रूग्ण.

राज्यात पुन्हा टेन्शन वाढले, ओमायक्राँन मुळे सापडले तब्बल नवे रूग्ण

मुंबई – गेल्या काही दिवसात ओमायक्राँन व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. या नविन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात ओमायक्राँन व्हेरिएंट रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ताज्या अपडेटनुसार, शनिवारी 18 डिसेंबर दिवसभरात राज्यात ओमायक्राँनचे आणखी 8 रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे ओमायक्राँनमुळे महाराष्ट्रात अध्याप एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आज राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी 8 रुग्ण ओमायक्राँन बाधित आढळले आहेत यापैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 3 रुग्ण सातारा येथे आणि 1 रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहेत. यासह राज्यातील ओमिक्राँन रुग्णाची संख्या 48 वर पोहोचली आहे. तथापि, यापैकी 28 रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान आजपर्यंत राज्यात एकूण 48 ओमायक्राँन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये (मूंबई-18,पिंपरी-चिंचवड-10,पुणे ग्रामिण-6,पुणे मनपा-3,कल्याण-डोंबिवली-2, उस्मानाबाद-2, बुलढाणा-1, नागपूर-1, लातूर-1, वसई-विरार-1,) रुग्णांचा समावेश आहे. तर, यापैकी 28 रुग्णांना त्यांची आरटीपीसार चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान ओमायक्राँनचाच वाढता संसर्ग बघता अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी ओमायक्राँनचा संसर्ग अधिक पसरु नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने आगामी 25 डिसंबर म्हणजेच ख्रिसमस नाताळ आणि नविन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत कठोर काही विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच ओरोग्य प्रशासनातून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केल जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button