Amalner

Amalner: रणधुमाळी 2024 : डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी..डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ सर्वच नेते व कार्यकर्ते पिंजून काढत आहेत तालुका..

Amalner: रणधुमाळी 2024 : डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला मिळाली नवसंजीवनी..डॉ. शिंदेच्या प्रचारार्थ सर्वच नेते व कार्यकर्ते पिंजून काढत आहेत तालुका..

अमळनेर:- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या उमेदवारीने तालुका काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी प्राप्त झाली असून प्रचारासाठी महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका पिंजून काढत आहेत.
अमळनेर तालुक्यात आधी काँग्रेसचे मोठे प्राबल्य होते. ॲड. ललिता पाटील ह्यांचा काँग्रेसच्या तिकिटावर निसटता पराभव झाला होता. त्यानंतर मात्र गटबाजीने काँग्रेसला उतरती कळा लागली होती. यंदाच्या निवडणुकीत मात्र अमळनेरची जागा काँग्रेसला सुटल्याने व डॉ. अनिल शिंदे यांच्यासारखा तुल्यबळ उमेदवार मिळाल्याने काँग्रेसला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे. महाविकास आघाडीचे सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे ग्रामीण भागात जाऊन डॉ. शिंदेचा प्रचार करत असून संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत. डॉ. अनिल शिंदे निवडून आल्यास तालुका काँग्रेसला पुन्हा जुने दिवस येतील असा विश्वास जुनेजाणते काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button