Amalner

बोरी नदी काठावरील गावांना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिला सतर्कतेचा इशारा..!

बोरी नदी काठावरील गावांना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिला सतर्कतेचा इशारा..!

अमळनेर येथील बोरी नदी काठावरील गावांना अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.बोरी मध्यम प्रकल्प , तामसवाडी, ता.पारोळा जि. जळगाव बोरी धरणाची पाणी पातळी 267.11 मी.ने वाढली असून
सध्या सकाळी 11.00 वा धरणाचे 07 दरवाजे 0.15 मी ने उघडण्यात आले आहेत. तर 3160 cusec विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. विसर्ग वाढवण्यात आला आहे.तसेच चाळीसगाव येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अजून वाढू शकते व पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे बोरी नदीत पाणी येऊन पूर येऊ शकतो. म्हणून काठा लगतच्या गावांनी सतर्क राहावे,नदी त उतरू नये.असे आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button