Kolhapur

शिक्षक सचिन गाडेकर राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

शिक्षक सचिन गाडेकर राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

सुभाष भोसले-कोल्हापूर
विजय लक्ष्मी फाउंडेशन सोलापूर व सिंगाडे चारीटेबल ट्रस्ट बेळगाव यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला सदर सोहळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यांमधून संत रोहिदास विद्या मंदिर कागल नगरपरिषद कागल शाळेमधील शिक्षक सचिन दगडू गाडेकर यांनी आदिवासी वाडी तालुका महाड जिल्हा रायगड व कागल नगरपरिषद कागल जिल्हा कोल्हापूर येथील शाळांमध्ये केलेल्या शैक्षणिक तसेच सामाजिक विशेष कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करणेत आले.हा राष्ट्रीय प्रेरणा गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बेळगाव येथे संपन्न झाला या पुरस्कारासाठी ततुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अभिनेत्री प्रिया पाटील व अभिनेत्री विजयालक्ष्मी खटावकर या उपस्थित होत्या. यांच्या शुभहस्ते त्यांना हा पुरस्कार देणेत आला या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ सुनील कदम , कागल तालुका कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष रमेश कांबळे ,संताजी पाटील, के वाय कांबळे इत्यादीं प्रमुख उपस्थित होते.
सचिन गाडेकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button