Maharashtra

परंडा येथे सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी एसबीआय बँके समोर पेन्शेनधारकांची गर्दी

परंडा येथे सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी एसबीआय बँके समोर पेन्शेनधारकांची गर्दी

कोरोना महामारीकडे सुशिक्षितांचाही कानाडोळा

प्रतिनिधी सुरेश बागडे

कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण राज्यात आढळून आल्यानंतर खबदारी म्हणून २३ मार्च पासून राज्यात संचारबंदी व देशातही लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे टप्प झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक चणचण भासू लागली त्यात मार्च एंन्ड महिना असल्याने नौकरदार पेन्शनधारक , निराधार लोकांच्या पगारी उशिरा बँकेत जमा झाल्याने परंडा येथील एसबीआय बँके समोर पेन्शनधारकांनी , निराधार वेतन धारकांनी मंगळवारी एकच गर्दी केल्याचे दिसून आले .
तर प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंगचे अवाहन करण्यात आले होते त्याला नागरिकाकडून हारताळ पोसल्याचे दिसून आले सोशल डिस्टन्सिंग म्हणजे दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी १ मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे असते परंतू परंडा येथील राष्ट्रीयकृत एसबीआय बँकेसमोर पेन्शनसाठी नागरिकांनी मोठी गर्दी करून सोशल डिस्टन्सिंगची ऐसी की तैसी करून टाकली व सोशल डिस्टन्स पाळा असे जिल्हा प्रशासनाकडून व न. प . यंत्रणा सांगत असतानाही अनेकांनी पगारीसाठी गर्दी केली . विशेष म्हणजे यामध्ये सुशिक्षीत समजली जाणारी मंडळीही सुचनांकडे कानाडोळा करून गर्दीसाठी पुढाकार घेताना दिसून आले
देशात कोरोना (कोविड- १९ ) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने सतत होत असलेली वाढ पाहता या महामारीला रोखण्यातील उपायात हलगर्जीपणा झाल्यास सर्वांनाच त्याची मोठी किंमत मोजावी लागेल तर गर्दी पाहूण बँक कर्मचारी व पोलीस कर्मचारी झाले हतबल तर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सामुदायिक जबाबदारी सांभाळणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button