Chopda

चोपडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय चोपडा विभागातर्फे विकेल तर पिकेल योजनेला जोरदार सुरुवात

चोपडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय चोपडा विभागातर्फे विकेल तर पिकेल योजनेला जोरदार सुरुवात

हेमकांत गायकवाड चोपडा

चोपडा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय चोपडा यांच्या मार्फेत विकेल ते पिकेल योनजे अंतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अंतर्गत थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेवर आधारित शेतमाल विक्री केंद्राचे उत्तघाटन आज दिनांक 01/02/2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मा.आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार श्री.प्रा.चंद्रकांतजी सोनवणे,जि.प.सदस्य, प.स.सदस्य, नगरसेवक ,उपविभागीय कृषि अधिकारी
श्री. दादाराव जाधवर साहेब , तालुका कृषि अधिकारी श्री.आर.आर.चौधरी व नगर पालिका मुख्याधिकारी,
अविनाश गागुंडे,पंचायत समिती मुख्याधिकारी श्री. कासोदे साहेब तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक चोपडा(BTM) श्री. महेंद्र रतिलाल साळुंखे,महेंद्र महाजन कृ.स तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक हजर होते.या प्रसंगी बळीराजा सेंद्रिय शेती गट, हातेड, श्रीसमर्थ सेंद्रिय गट, चुंचाळे, भूमिपुत्र शेतकरी स्वयंम साहाय्यता गट चुंचाळे, उनपदेव शेतकरी गट, अडावद, यांच्या मार्फेत सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यात आले त्यात मशरूम, ब्रोकोली, ओलीहळद या शेतमालाला ग्राहकांनी पसंती दिली तसेज ग्राहकांनी शेतकरी गटाचे संपर्क नंबर शेतकऱ्याकडून घेतले तसेज सदरील कार्यक्रमात, शेवगा, कांदा, टोमॅटो, पेरू, तूरडाळ, उळीदडाळ, चणाडाळ, कारले, दुधीभोपळा, दोडके, शेपू पालक, मधुमका,गाजर, कागदी लींबु, वांगे खरेदीस ग्राहकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. सविस्तर माहिती उपस्थितानकडुन व कृषी अधिकारी, तालुका तत्रंज्ञान व्यवस्थापक चोपडा (बी टी एम) महेंद्र साळुंखे यांच्या कडून मिळाली..

चोपडा येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय चोपडा विभागातर्फे विकेल तर पिकेल योजनेला जोरदार सुरुवात

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button