Chopda

मन्यावस्ती येथील पाड्यावर आदिवासी बांधवांना प्रेरणा दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे दिवाळी फराळ वाटप

पोलीस, पत्रकार आणि पोस्टमन जिथे पोहचले नाही तिथे प्रेरणा दर्पण फाउंडेशन पोहचले — प्रा.अरुणभाई गुजराथी

दिवाळीचा फराळ वाटप हा उपक्रम प्रेरणा दर्पण फाउंडेशनसाठी मोराचं पीस ठरेल — प्रा.अरुणभाई गुजराथी

मन्यावस्ती येथील पाड्यावर आदिवासी बांधवांना प्रेरणा दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे दिवाळी फराळ वाटप

चोपडा (प्रतिनिधी )- दिवाळीचा हा सण इतरांना आनंद वाटण्याचा व इतरांचे दुःख कमी करण्याचा सण आहे. पोलीस, पत्रकार आणि पोस्टमन जिथे पोहचले नाही अशा अतिशय दुर्गम भागातील मन्या वस्तीत दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी प्रेरणा दर्पण फाउंडेशन पोहोचली. दिवाळीचा फराळ वाटप हा उपक्रम प्रेरणा दर्पण फाउंडेशनसाठी मोराचं पीस ठरेल, अशी भावना माजी विधानसभा अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त करत फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
चोपडा तालुक्यातील खर्डी या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वत रांगात असलेल्या मन्या वस्ती या आदिवासी पाड्यावर चोपडा येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनच्यावतीने दिवाळी फराळाचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी वस्तीतील आदिवासी बांधवांशी संवाद साधतांना प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, आदिवासी बांधवांमध्ये उच्च कोटीची बुद्धिमत्ता असते परंतु त्यांना ती व्यक्त करण्याची संधी मिळत नाही यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिक्षण, आरोग्य, पोषण आहार, रोजगाराच्या संधी पाड्यांपर्यंत पोहोचल्याने त्यांच्याही जीवनमानात सुधारणा होईल.
आदिवासी बाधवांच्यां घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने प्रेरणा दर्पण फाउंडेशन चोपडा तर्फे दानशूर व्यक्तींकडे सोशल मीडियाच्या माध्यामातून विनती आवाहन केले होते त्याला अनेक दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत केली. त्या अनुषंगाने संस्थेने दिवाळी मन्या वस्ती या आदिवासी पाड्यांवर फराळ वाटपाचा उपक्रम राबवला आहे. गावातील १०० जणांना मिठाई, फराळ असे साहित्य वितरण केले. तसेच चोपडा शहरातील अनेक भागात असे एकूण २५० पॉकिट वाटप करण्यात आले. प्रेरणा दर्पण फाउंडेशनने या पूर्वीही कोरोनाच्या काळात अडीच महिन्या पर्यंत रोजचे २०० लोकांना जेवण वाटप करण्यात आले होते. प्रेरणा दर्पण फाउंडेशन नेहमी सामाजिक कामात अग्रसर असते असेही मा.अरूणभाई गुजराथी यांनी बोलताना सागितले
याप्रसंगी चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपडा नगर परिषदेतील गटनेते जीवन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नेमीचंद जैन, खर्डीचे उपसरपंच राधेशाम पाटील, ग्रा.पं.शिपाई शशी कोळी, ग्रा पं सदस्य , डॉ. सुधाकर पाटील यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष डॉ. निर्मल टाटीया, सचिव लतिष जैन, संजय बारी, ॲड. अशोक जैन, विश्वास वाडे, निलेश जाधव, आकाश जैन, अतुल पाटील हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button