Chopda

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरणे निकाली…

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरणे निकाली…

राष्ट्रीय लोक अदालतीत चोपडा न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण 420 पैकी 80 तर दाखलपूर्व प्रकरणे बँक,म.रा.वी. म.,च्या व ग्रामपंचायतीच्या दाखलपूर्व 11276 प्रकरणापैकी 339 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली 13461049 रुपये झाली
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालका विरुद्ध शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या धनादेश अनादर प्रकरणी एकूण 59 प्रकरणे निकाली झाली व एकूण रक्कम रुपये 59 लाख 91 हजार 343 वसूल झाली.
चोपडा (प्रतिनिधी)– मा. उच्च न्यायालय मबुई व मा. विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये दि.11डिसेंबर 2021 शनिवार रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले होते यात दिवाणी व फौजदारी प्रलबित प्रकरण 420 पैकी 80 तर दाखलपूर्व प्रकरणे ग्रामपंचायतीच्या दाखल पूर्व प्रकरणे, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, म.रा.वी.म,च्या दाखलपूर्व 11276 प्रकरणापैकी 339 प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली एक कोटी 34 लाख 61 हजार 49 रुपयांची झाली.
सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतला सुरवात झाली यावेळी पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांच्या समोर पंच म्हणून ऍड.बी.सी. पाटील, ऍड. सी.एच. पाटील, चोपडा वकील संघाचे अध्यक्ष ऍड.किरण जाधव सचिव ऍड. विलास डी. बाविस्कर, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, ऍड. प्रसाद काबरे, ऍड.एस.एफ.जैन, ऍड.प्रवीण एच.पाटील, ऍड. नितिन चौधरी,ऍड.उमेश बी.पाटील,ऍड. धर्मेंद्र एस.सोनार, ऍड. सी. आर. निकम, ऍड.ऐ.व्ही.जैन ऍड. एस. डी. सोनवणे, ऍड.अबादास पाटील,ऍड. एस. डी.पाटील,ऍड. एस.जे.पाटील,ऍड. रिजवान पटेल, ऍड.पी.एच.माळी, अँड. नितीन महाजन , अँड. नितीन एम.पाटील,ऍड.यु.के.पाटील आदी हजर होते
चोपडा न्यायालयतील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण 420 ठेवण्यात आले होते त्यातून दिवाणी 1 प्रकरण, फौजदारीचे धनादेश अनादर प्रकरणे 74 व पती-पत्नी वादाचे पाच प्रकरण अशी एकूण 80 प्रकरणें निकाली काढण्यात आले यात 76 लाख 73 हजार 10 रुपये वसूली झाली. बँक,मराविम व ग्रामपंचायतीचे दाखल पूर्व प्रकरणे यांची एकूण 11276 प्रकरणातून 339 प्रकरणे निकाली झाले यात 57 लाख 88 हजार 39 रुपये वसूल करण्यात आले. मराविमडळ शहर प्रकरणातून 32 प्रकरण निकाली झाले यात 106380 रुपये वसूल करण्यात आले एकूण दाखल पूर्व प्रकरणात 5788039 रुपये वसूल करण्यात आले तर दाखल प्रकरणातून 76 लाख 73 हजार 10 रुपये वसूल करण्यात आले अशी एकूण 1 कोटी 34 लाख 61 हजार 49 रुपये वसूल करण्यात आले
चोपडा साखर कारखाना विरुद्ध शेतकऱ्यांनी दाखल करण्यात आलेले धनादेश अनादराचे 59 प्रकरणे आपसात तडजोड होउन रक्कम 59 लाख 91 हजार 343 रुपयांचे धनादेश लोकन्यायालयात वाटप करण्यात आले चोपडा साखर कारखाना तर्फे मिलिंद माणिक बाविस्कर यांचे अनमोल सहकार्य लाभले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यानी व न्यायालय येथील सहा.अधिक्षक एस.जी.नगरकर सहा.अधिक्षक डी.जी.चौधरी, लघुलेखक ए. ए. माळी, वरीष्ठ लिपिक ए. एच.परदेशी, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर डी.एम. महाजन,एन.डी. कुलकर्णी, एम.बी. बाविस्कर,एस.जे.देवरे,एस.के. पाटिल,वाय.महाजन, बेलीफ एस.के.शेकडे, बी.जी.सूर्यवंशी, शिपाई प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, दिपक महाजन आदिंनी सहकार्य केले. पंचायत समितीचे जे.पी.पाटील यांचे सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button