Indapur

मेजर संतोष सावंत अनंतात विलीन, राजवर्धन पाटलांसह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती.

मेजर संतोष सावंत अनंतात विलीन, राजवर्धन पाटलांसह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती.

दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर तालुक्यातील शेटफळ गावचे सुपुत्र संतोष रामहरी सावंत यांचे आकस्मित निधन झाल्याने संपुर्ण शेटफळ हवेली व परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांसह तालुक्यातील माजी सैनिक बांधव व परिसरातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष सावंत हे केंद्रीय राखीव पोलिस दलात आसाम राज्यात त्रिपुरा या ठिकाणी सेवा बजावत होते. या सेवेतून निवृत्ती घेण्यास केवळ चार महीने अवधी शिल्लक असतानाचं ह्लदयविकाराच्या झटक्याने 29 फेब्रुवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचे वय अवघे 42 वर्ष होते.सावंत यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलात 19 वर्षे व सात महिने सेवा केली. त्यांचे आसाम- त्रिपुरा येथे आकस्मित निधन झाल्याचे समजताच गावात व परिसरात शोककळा पसरली होती. दिनांक 2 मार्च रोजी शेटफळ हवेली येथे सावंत यांच्या पार्थिवावर सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी “अमर रहें अमर रहें संतोष सावंत अमर रहें” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सावंत यांच्या पाश्चात्त्य पत्नी, एक मुलगा,आई-वडील,बंधु व वहिनी असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button