Nashik

Nashik: नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी मोहाडी हायस्कूल चे शिक्षक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या उपक्रमात सहभागी मोहाडी हायस्कूल चे शिक्षक

सुनिल घुमरे नाशिक विभागीय प्रतिनिधी

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या नविन वर्षाचे स्वागत एक लाख किलोमीटर सायकलिंगच्या अभिनव उपक्रमात म.वि.प्र.समाजाचे के.आर.टी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. या उपक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी व शिक्षकांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर,कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी,श्री.नंदकुमार डिंगोरे, श्री.रंगनाथ घोलप प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षिका देशमुख मॅडम यांनी माधवराव पवार सर, शरद निकम सर व प्रमोद सोनवणे सर यांचे स्वागत केले. यावेळी प्राचार्य श्रीराम खुर्दळ म्हणाले, की पर्यावरणाच्या संवर्धनासाठी , आरोग्याच्या दृष्टीने व आर्थिक दृष्टीने प्रदूषण मुक्त जीवन जगण्यासाठी सायकल महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे नियमितपणे सायकल व योगासने करण्याचू आवाहन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button