Nashik

येवला तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बुधवारी सहविचार सभा

येवला तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची बुधवारी सहविचार सभा

नाशिक शाताराम दुनबळे

नाशिक-: येवला येथील एन्झो-केम महाविद्यालयात येवला तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा मंगळवार दि.९ ऑगस्ट २०२३ दुपारी १:०० वा आयोजित करण्यात आली असून आगामी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजना संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.अशी माहिती येवला तालुका शालेय क्रीडा स्पर्धा संयोजक नवनाथ उंडे सर यांनी दिली आहे.
एन्झो- केम महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजना क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना शालेय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धा आयोजन दिनांक,स्थळ,वेळ निश्चितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील,येवला तालुका क्रीडा अधिकारी संजीवनी जाधव,क्रीडा अधिकारी अविनाश टिळे,महेश पाटील,भाऊसाहेब जाधव,संदीप ढाकणे,अरविंद खांडेकर हे अधिकारी क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करणार आहे.
सभेला तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य एस.ए.खाखरिया,तालुका क्रीडा संयोजक नवनाथ उंडे यांनी केले आहे.अशी माहिती येवला तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख एस.डी.शेजवळ यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button