India

Fact Check: देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री आहेत कोट्यधीश… पहा कोणाची किती आहे संपत्ती..! सर्वात जास्त आहे हे महाशय तर सर्वात कमी आहेत ह्या मुख्यमंत्री…

Fact Check: देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री आहेत कोट्यधीश… पहा कोणाची किती आहे संपत्ती..! सर्वात जास्त आहे हे महाशय तर सर्वात कमी आहेत ह्या मुख्यमंत्री…
देशातील उद्योगपतींच्या किंवा क्रिकेटपटूंच्या संपत्तीबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध होतात. कोणाकडे किती संपत्ती आहे, हे त्या माध्यमातून आपल्याला माहीत होतं. देशातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती, क्रिकेटपटू किंवा अभिनेता कोण आहे, हे तुम्हाला माहिती असेल. पण, देशातील सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती उघड झाली आहे.
पक्षाचा निवडणूक खर्च, राजकीय पक्षांना मिळणारा निधी, गुन्हेगारी इतिहास आणि नेत्यांची मालमत्ता यावर लक्ष ठेवणाऱ्या असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) एक अहवाल जारी केला आहे.एडीआरच्या अहवालानुसार देशातील सध्याच्या ३० मुख्यमंत्र्यांपैकी २९ मुख्यमंत्री कोट्यधीश आहेत.

  • सर्वाधिक संपत्ती असलेल्या पहिल्या तीन मुख्यमंत्र्यांमध्ये आंध्र प्रदेशचे जगन मोहन रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे पेमा खांडू आणि ओडिशाचे नवीन पटनायक यांचा समावेश आहे.

Fact Check: देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री आहेत कोट्यधीश... पहा कोणाची किती आहे संपत्ती..! सर्वात जास्त आहे हे महाशय तर सर्वात कमी आहेत ह्या मुख्यमंत्री...

ADR नुसार जगन मोहन यांच्याकडे ५१० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे १६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.तर सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर नवीन पटनायक असून त्यांची संपत्ती ६३ कोटी रुपयांहून अधिक आहे.एडीआरच्या अहवालानुसार, देशातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती १० कोटी ते ५० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तर १८ मुख्यमंत्र्यांची संपत्ती एक कोटी ते १० कोटींच्या दरम्यान आहे. केवळ एका मुख्यमंत्र्यांची संपत्ती 1 कोटींपेक्षा कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. त्यांची एकूण संपत्ती १५ लाख ३८ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.सर्वाधिक कमी संपत्ती असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे आहे. त्यांची एकूण संपत्ती १ कोटी १८ लाख इतकी आहे.

Fact Check: देशातील 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री आहेत कोट्यधीश... पहा कोणाची किती आहे संपत्ती..! सर्वात जास्त आहे हे महाशय तर सर्वात कमी आहेत ह्या मुख्यमंत्री...

CM शिंदे 10 च्या वर..!
मुख्यमंत्र्यांची शैक्षणिक पार्श्वभूमीची दखल एडीआरने घेतली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाख १२ हजार रुपयांची संपत्ती आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची देणी ३ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांची आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सर्वाधिक देणी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणचे के. चंद्रशेखर राव ८ कोटी ८८ लाख रुपयांसह पहिल्या तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ४ कोटी ९९ लाख रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

सर्वाधिक मालमत्तेच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 26 व्या क्रमांकावर आहेत. सीएम योगी 1.54 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे तीन कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे 3.44 कोटी रुपयांची संपत्ती आहे तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील 1.97 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

एडीआर रिपोर्टनुसार, देशातील 11 राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत आणि ते सर्व कोट्यधीश आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. यापैकी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे सर्वाधिक 23 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button