Mumbai

Big Breaking….महापोर्टल अखेर बंद ठाकरे सरकारचा  मोठा निर्णय

महापोर्टल अखेर बंद ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…

नितीन माळे

सततच्या तक्रारींनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत, अखेर महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याबाबतीतच्या त्रुटींमुळे परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या.

त्याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले आहे.

सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवर मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून अनेक गंभीर आक्षेप घेतले जात आहेत.

त्यानंतर विद्यार्थ्यांचा रोष लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी देखील यात लक्ष घाततले होते. खा. सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली होती.

या सेवेत पारदर्शकता नाही अशी उमेदवारांची तक्रार असून पात्र उमेदवारांवरही अन्याय होतोय. त्यामुळे ते बंद व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button