रावेर

मतदार जागृती अभियानातंर्गत पथनाट्य व एकांकिका सादरीकरण

मतदार जागृती अभियानातंर्गत पथनाट्य व एकांकिका सादरीकरण

मुबारक तडवी
चिनावल ता:रावेर, येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात मतदार जागृती अभियान स्वीपअंतर्गत गावात मतदार जागृती रॅली काढून ठिकठिकाणी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी अतिशय प्रभावी पथनाट्य सादर केले. सदर विद्यालयात गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या सूचनेनुसार मतदार जागृती साठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन तर मतदार जागृती रॅली,एक पत्र मतदानासाठी,पालकांचे संकल्पपत्र इत्यादी उपक्रम मतदार जागृतीसाठी हाती घेण्यात आलेले आहे.एकांकिका व पथनाटयासाठी उपशिक्षक एल.एम.ठाकूर सर मार्गदर्शन करीत आहे. मतदार जागृती अभियानातील स्विप कार्यक्रमांना प्राचार्य शारदा बैरागी,उपप्राचार्य जी.पी.लोखंडे,पर्यवेक्षक माया बिऱ्हाडे,सांस्कृतिक समिती प्रमुख एच.आर.ठाकरे,शिक्षक प्रतिनिधी लीना कोल्हे यांचे सहकार्य तर एम.एस.महाजन,पी.पी.मालखेडे,हेमलतापाटील,एम.बी.पाटील,एन.एन.महाजन,ए.व्ही.राणे,जी.बी.चोपडे,पी.एस वारके,पी.एम.जावळे,के.आर.पाटील,डी. आर.नेहेते,आर.ए.होले,योगेश बोरोले,यशवंत दुसाने,जाबीर तडवी,कविता सरोदे हे परिश्रम घेत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button