रावेर

रावेर तालुक्यातील उटखेडा कळमोदा रस्त्याचे काम होतेय निष्कृष्ट परिसरातील वाहन धारक व शेतकऱ्यांनी व्यक्त करताय संताप….

रावेर तालुक्यातील उटखेडा कळमोदा रस्त्याचे काम होतेय निष्कृष्ट
परिसरातील वाहन धारक व शेतकऱ्यांनी व्यक्त करताय संताप….

मुबारक तडवी

चोपडा ते थेट मध्यप्रदेश ला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा झाडं, काटेरी झुडपे व गवताळ जशास तसे दिसून येत असूनसुद्धा यांवर अगदी कच्च्या मुरूम व काचखडी तेही जाडीभरडी टाकून डांबराचे फक्त ओवाळणी केली आहे,
यामुळे परिसरातील वाहनधारक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या वर संताप व्यक्त केला,
कारण हा रस्ता दैनंदिन रहदारीच्या सह केळीच्या ट्रक, मालगाडी, ट्रॅक्टर व बैलगाडी सह शाळेच्या खाजगी बसेस सह रावेर, उटखेडा, लोहारा,गौरखेडा, कुंभारखेडा, सावखेडा,चिनावल सह खिरोदा कळमोदा न्हावी यावल रावेर यावल तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा दुवा आहे,
या परिसरात केळी लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होतात व अशा रीतीनें जर या रस्त्यांचे काम झाले तर शेतकरी सह सर्व सामान्य जनतेला रहदारीच्या समस्या कायमस्वरूपी चं बेडसावित राहीलं म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संबंधित ठेकेदार व अधिकारी व लोक प्रतिनिधी वर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी या परिसरातील केळी उत्पादक शेतकरी विठ्ठल राणे,
पंडित हरी महाजन, अनिल कडू पाटील, मगन हरी पाटील, सुकदेव चौधरी सह अनेक नागरिक उपस्थित होते.
तर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग जळगाव यांच्या अधिपत्याखाली तर माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी प्रयत्न करून प्रजिमा.५८ या रस्त्यांवर दोन पूल तर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण यासाठी अंदाजे किंमत २०० लक्ष आहे ,
तरीही या रस्त्यांचे काम लवकरच लवकर व मजबूत आणि चांगल्या प्रकारे डांबरीकरण करण्यात यावे व असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
याकडे संबंधित ठेकेदार व अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीने बघता हे वेळच ठरवेलं ? संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हे निकृष्ट कामाचे साहित्य आले नसावे का ? का त्यांचे डोळ्यांवर ठेकेदाराची आर्थिक पट्टी बांधली गेली काय ? नाही तर मग तक्रार करूनही अन् देखी करण्या मागचा संबंधित अधिकाऱ्यां चा हेतू काय ? तरी सा. बा विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देवून दर्जेदार साहित्य वापरून समक्ष हजर राहून उत्कृष्ठ काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button