Maharashtra

शिक्षकांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध, तहसीलदारांना दिले निवेदन

शिक्षकांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध, तहसीलदारांना दिले निवेदन

शिक्षकांवरील लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध, तहसीलदारांना दिले निवेदन

चोपडा प्रतिनिधी सचिन जयस्वाल
मुंबई येथे दि.२६ ऑगस्ट रोजी अनुदान मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलक शिक्षकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. ही घटना सर्व शिक्षक वर्गासाठी मनोधैर्य खचवणारी आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी चोपडा तालुक्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटनानी एकत्र येत निषेध केला व त्या संदर्भात चोपड्याचे तहसीदार अनिल गावित यांना निवेदन दिले.
तत्तपूर्वी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी निषेध व्यक्त करण्यासाठी दि. २८ रोजी ठिक दुपारी ३ वाजता चोपडा येथील म्युन्सिपल हायस्कुल मध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आयोजित निषेध सभेसाठी जमले होते. यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष आर. एच. बाविस्कर, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष मंगेश भोईटे, तालुका मुख्याध्यापक संघाचे सुनील पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे प्रा. संदीप पाटील, विना अनुदानित उच्च माध्य. शाळा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. अजहर शेख यांनी मनोगत व्यक्त करत शासनाच्या या निंदनीय कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. 
या निषेध सभेनंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सुनील पाटील, सुनील चौधरी, व्ही. आर. पाटील, खाजगी प्राथ. शिक्षक संघटनेचे संजय सोनवणे, शिक्षक भारतीचे संजय पाटील, शिक्षकेतर संघटनेचे कैलास महाजन, कलाध्यापक संघाचे दिनेश बाविस्कर, क्रीडा शिक्षक महासंघाचे अशोक साळुंखे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अनिल वाघ, शिक्षक सेनेचे जगदीश जाधव, संजय बारी, विकास शिर्के यांच्यासह चोपडा तालुका माध्यमिक मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर संघ, चोपडा तालुका खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना, चोपडा तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, चोपडा तालुका शिक्षक भारती संघटना, चोपडा तालुका कलाध्यापक संघटना, चोपडा तालुका क्रीडाशिक्षक महासंघ, चोपडा शहर व कॉग्रेस शिक्षक सेल, चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक सेना व इतर सहयोगी शिक्षक संघटनाचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button