Amalner

Amalner: नवरा शेतात… बायको गायब

Amalner: नवरा शेतात… बायको गायब

अमळनेर पती शेतात गेल्यानंतर २८ वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना तालुक्यातील भिलाली येथे घडली. ती आजुबाजूला आणि माहेरी ही आढळून आली नाही.त्यामुळे मारवड पोलीसात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, दिनांक ६ जून रोजी सकाळी सदर महिलेचा पती शेतात कामासाठी गेला. दुपारी १२:३० वाजता तो घरी आला असता पत्नी दिसून न आल्याने त्याने घरी विचारले असता त्यांनाही माहित नसल्याने त्यांनी आजूबाजूला तपास केला. शेजारील महिलेने सांगितले की, सदर महिला पांझरा नदीकाठी दिसली होती व बेटावद येथे गादी भरायला जात असल्याचे सांगितले. त्यावरून बेटावद येथे व आजूबाजूच्या परिसरात तपास केला असता कोणतीच माहिती न मिळाल्याने महिलेच्या माहेरी तपास केला. परंतु शोध न लागल्याने मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ सचिन निकम करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button