Amalner

?️अमळनेर कट्टा..बापरे..!चोरट्यांच्या निशाण्यावर आता शाळा..!10 नं शाळेत झाली चोरी..!

?️अमळनेर कट्टा..बापरे..!चोरट्यांच्या निशाण्यावर आता शाळा..!10 नं शाळेत झाली चोरी..!

अमळनेर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांनी आता शाळेत चोरी करण्यास देखील कमी केले नाही. आता चोरट्यांच्या निशाण्यावर शाळा आल्या असून अमळनेर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक १० मध्ये चोरी केली आहे. यात चोरट्याने 2400 रु च्या खुर्च्या, टेबल फॅन इ साहित्य चोरून नेले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चोराने मुख्याध्यापकांच्या खोलीचे कुलूप तोडून कपाटातील सामान फेकून दिला. व वरील साहित्य चोरून नेले. मुख्याध्यापिका भारती दगाजीराव पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील हटकर करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button