Faijpur

फैजपुरात गेल्या चार महिन्यांपासून अवैध वाळूच्या उपसा सुरू असून महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष आहे का

फैजपुरात गेल्या चार महिन्यांपासून अवैध वाळूच्या उपसा सुरू असून महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दूर्लक्ष आहे का
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील गेल्या चार महिन्यांपासून फैजपूर सह परिसरात अवैध वाळू उपसा बिनधास्तपणे रात्रंदिवस सुरू असून सर्वत्र लॉक डाऊन परिस्थिती सुरू असतांना फैजपूर सह परिसरात गेल्या चार महिन्यांच्या कार्यकाळापासून अवैध वाळूच्या उपसा सुरू असून अवैध वाळू उपसा करणार्यांनी फैजपुरात दुकाने लावून बसले असून शासनाच्या अवैध वाळू उपसा करण्यासाठी जणू काही फौजफाटाच तयार केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या चार महिन्या पूर्वी प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांनी अवैध वाळू उपसा करणार्यावर कडक कारवाई करत चांगलाच वचक निर्माण केला होता प्रांताधिकारी अजित थोरबोले हे नुकतेच बदलून गेले तेव्हापासून अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू झाली असून रात्रंदिवस वाळू उपसामुळे जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असे चित्र आहे त्यामुळे फैजपूर सह परिसरात बांधकामे सुद्धा जोराने सुरू झालेले आहे सध्या सर्वत्र लॉक डाऊन ची गंभीर परिस्थिती लक्षात घेता जनसामान्य नागरिकांना घरीच बसावे लागत आहे परंतु या अवैध वाळू उपसामुळे फैजपुरातील व परिसरातील नद्यांच्या पातळ्या खोल होत असून शासनाचे करोडो रूपयांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे सध्या लॉक डाऊन परिस्थिती असून महसूल विभागाचे हे काम असून महसूल विभाग या अवैध वाळू वाहतुकीला अभय देत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे महसूल विभागाचे काम लॉक डाउन परिस्थितीत पोलिसांना करावे लागत आहे पोलिसांनी बंदोबस्त करावा कि अवैध वाळू च्या पाठलाग करावा अशी चर्चा सुरू असून चार महिन्यांपूर्वीपासून येथील नव्याने रूजू झालेले प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्यावरसुद्धा वाळू तस्कराने गाडी अंगावर आणून जीवघेणा हल्ला केला होता तरीसुद्धा वाळू तस्करीला कोणाच्या आशीर्वाद आहे या अवैध वाळू उपसा करणार्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button